प्रमोद एन. चिंतलवार
✍🏻तालुका प्रतिनिधी गडचिरोली✍🏻 मो. नं. 9405133420
गडचिरोली, दि. ४ सप्टेंबर : इंदिरानगर येथील निर्मल विद्या मंदिरात शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर रोजी कृष्णजन्माष्टमीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी राधा-कृष्णाच्या आकर्षक वेशभूषेत सहभागी होत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कृष्णजन्माष्टमीच्या निमित्ताने शाळेच्या परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत उपस्थित राहून भगवान श्रीकृष्णाच्या बाललीला व जन्माष्टमीचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा वासेकर यांच्यासह कोमल नैताम नगरसेविका नगर परिषद गडचिरोली
शिक्षकवृंदातील प्रीती गेडाम, मनिषा नैताम, आणि मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होता. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment
0 Comments