जळगाव: लमांजन-वाकडी-कुऱ्हाडदे समूह ग्रामपंचायती अंतर्गत घरकुल पात्र लाभार्थी यांचा मनरेगा निधी मध्ये व शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत आर्थिक अनियमितता व गैरव्यवहार झाल्याबाबत पंचायत समिती जळगाव येथील चौकशी अधिकारी यांनी स्वतः दिनांक 29/06/2026 रोजी चौकशी हवालात नमूद केले आहे.
मात्र चौकशी अहवालात निदर्शनास आलेल्या बाबींवर अद्याप समधित रोजगार सेवक आणि ग्रामसेवक यांचावर प्रभावी कारवाई झालेली नसल्याचा आरोप सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते दत्तू रतन कोळी (सपकाळे) यांनी केला आहे.
विशेषतः मौजे कुऱ्हाडदे येथील मनरेगा कामांमध्ये पात्र लाभार्थ्यांचे जॉब कार्ड न जोडता रोजगार सेवक सागर नरोटे यांनी त्यांच्या आई-वडिलांचे व अन्य नातेवाईक यांचे जॉब कार्ड जोडून निधी काढल्याचे दस्त ऐवजी पुरावे उपलब्ध असून देखील गटविकास अधिकारी जळगाव यांनी कोणत्याही प्रकारचे कारवाई केली नाही असा आरोप करण्यात आला आहे.
याप्रकरणी रोजगार सेवक सागर नरोटे व ग्रामसेवक यांची भूमिका तपासण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच या प्रकरणाची संपूर्ण माहिती गट विकास अधिकारी पंचायत समिती जळगाव यांना असूनही आज पर्यंत कोणतीही कारवाई झालेली नसून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची भूमिका तसेच कोणाचे संगनमत अथवा निष्काळजीपणा होता का, याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सन 2021 पासून आजपर्यंत ग्रामपंचायतीच्या संपूर्ण कामकाजाची वरिष्ठ स्तरीय व निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई व गुन्हा दाखल करावी. तसेच शासकीय निधीची वसुली करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडे दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रोजीचा लोकशाही दिनाच्या तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.

Post a Comment
0 Comments