Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

शिवसेना (शिंदेगट) गटाच्या तालुका प्रमुख पदी नितीन साळवी यांची नियुक्ती. राष्ट्रवादी पुढे आव्हान.



तळा -किशोर पितळे-

तळा :- हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख मा. एकनाथजी शिंदे तथा (उपमुख्यमंत्री) यांच्या आदेशानुसार तळा शिवसेना प्रभारी तालुका प्रमुखपदी नितिन साळवी याची नियुक्ती करण्यात आली असून तालुकाप्रमुखपदाचीधुरासांभाळण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. नितीन साळवी हे कट्टर एकनिष्ठ शिवसैनिक आहे पक्ष संघटना वाढी साठी व सक्रियपणे प्रचार,प्रसार करून येत्या ग्रामपंचायती च्या निवडणूकीची जबाबदारी ठेवून सर्व शिवसेनापक्षाच्या ग्रामपंचायती होण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे.सदरची नियुक्ती हिपक्षा अंतर्गत होणाऱ्या निवडणूका होईपर्यंत असेल असा आदेश पक्षाचे सचिव संजय मोरे यांनी नियुक्ती पत्रात नमूद केले आहे. परंतु आज पर्यंतच्या इतिहासात प्रभारी तालुका प्रमुख पदाची जबाबदारी टाकल्याने पक्षात उलट सुलट चर्चेचा उधाण आले आहे. त्यामुळे संभ्रम होत आहे मात्र नितीन साळवी आता अशा पध्दतीने धुरा सांभाळून पक्ष संघटन व आगामी ग्रामपंचायत निवडणूका हाताळतात हे पहावे लागणार आहे.

      तालुका प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारणे एवढेच साळवी यांच्यासमोर आव्हान नसून,राष्ट्रवादीचा हाराजकीय गड रोखण्यासाठीची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आहे.जुन्या कार्यकर्त्यां सोबतच नव्या पिढीतील कार्यकर्त्यांना जोडणे आणि आगामी राजकीय आव्हानां साठी पक्षाची यंत्रणा सज्ज करणे ही त्यांच्या साठी महत्त्वाची जबाबदारी ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली सत्ता आणि राजकीय प्रभाव अश्वमेध रोखण्यासाठी पालकमंत्री पदाच्या माध्यमातून शिवसेना तळा तालुक्यात नवे राजकीय समीकरण उभे करणार?याची उत्सुकता आता निर्माण झाली आहे.त्याचे सर्व राजकीय स्तरातून व शिवसैनिकां कडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments