मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
अहेरी :- अहेरी तालुका मधील आरोग्य केंद्र पेरमिली, आरोग्य उपकेंद्र कोडसेपल्ली अंतर्गत येणारा मौजा - काप्पेवंचा गावातील आदिवासी समाजाचा आदिम माडीया (PVTG) जमातीचा दोन महिन्याचा पवन शामराव तलांडे याच्या बाळाला लसीकरण दिल्यानंतर दुर्दैवी मृत्यू झालेला आहे.
यामध्ये मृत्यू झालेला बाळाचा आई सुनीता शामराव तलांडीआणि वडील शामराव दोघे तलांडी यांच्या सांगण्यानुसार - दिनांक - ०७/०९/२०२६ रोजी, *मौजा - काप्पेवंचा येथे दुपारी ०२.०० वाजेचा दरम्यान आरोग्य सेविका, MPW, आशा वर्कर, कंत्राटी आरोग्य सेवक हे चौघेजण आमचा घरी आले आणि तुमचा बाळाला लसीकरण देतो म्हणुन आमचा मुलाला ०४ इंजेक्शन दिले आणि ०२ वेगवेळ्या बाटलीचे ०२ डच औषधी सुद्धा पाजले. यामध्ये ०२ हाताला ०२ इंजेक्शन आणि ०२ पायाला ०२ इंजेक्शन असे एकुण ०४ इंजेक्शन दिले आहेत.
आमचा बाळाला इंजेक्शन आणि औषधी दिल्यानंतर - आरोग्य सेविका, MPW, आशा वर्कर, कंत्राटी आरोग्य सेवक हे म्हणाले की, फक्त एक दिवस ताप येऊ शकतो त्यानंतर काहीच होत नाही असे सांगुन ते कवटाराम गावाकडे निघुन गेले.
परंतु कवटाराम गावावरून पुन्हा आमचा काप्पेवंचा गावातूनच कोडसेपल्ली ला निघुन गेले परंतु आमचा बाळाचा विचारपुस सुद्धा केले नाहीत.
तसेच आमचा बाळाला इंजेक्शन आणि औषधी दिल्यानंतर लगेच काही तासातच बाळ बेहोश झाल्यासारखे होत होता, दुध पितच नव्हता, त्यानंतर सायंकाळ झाल्यामुळे आमचा मुलाला झोपण्यासाठी ठेवलो. आणि रात्री १२.०० वाजेचा दरम्यान आमचा मुलाचा मृत्यू झाला आहे.
त्यानंतर आम्ही आमचे कुटुंबियांना माहिती दिलो, गावकऱ्यांना सुद्धा माहिती दिलो, आणि आमचा मुलाचा मृत्यू नंतर आशा वर्कर यांना माहिती देण्यात आली, आरोग्य सेविका यांना माहिती देण्यासाठी फोन करण्यात आले परंतु आरोग्य सेविका फोन उचलले नाही.
म्हणुन आरोग्य केंद्र पेरमिली आणि आरोग्य उपकेंद्र कोडसेपल्ली यांच्या निष्काळजी पणामुळे आमचा मुलाचा/बाळाचा मृत्यू झाला असे गंभीर आरोप मृत्यू झालेला बाळाचा आई आणि वडीलांनी केले.
त्यानंतर दिनांक - ०८/०९/२०२६ रोजी , आमचा मुलाला/बाळाला न्याय मिळण्यासाठी, सर्व दोषींवर कठोर कारवाई झाला पाहिजे म्हणुन आमचा राजाराम पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आला आहे. तसेच मृत्यू झालेला बाळा PM करण्यासाठी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात नेतांना गाडीसोबत आरोग्य केंद्र पेरमिली आणि आरोग्य उपकेंद्र कोडसेपल्ली येथील एकादी कर्मचारी आमचा बाळासोबत रुग्णालय आले नाही आणि PM करतांना उपस्थित सुद्धा नव्हते. हे दुर्दैवी आहे.
म्हणुन आता शासनाने आमचा मुलाला/ बाळाला लसीकरण देऊन जीव घेणारे सर्व आरोपींना शोधुन, त्यांची सखोल चौकशी करून, सर्व दोषींवर कठोर कारवाई करावे अशी मागणी मृत्यू झालेला बाळाचा आई वडीलांनी केली आहे.
बालाजी गावडे यांची प्रतिक्रिया =
दोन वर्ष्याच्या पवन शामराव तलांडी चिमुकल्या बाळाला आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांचा निष्काळजी पणामुळे दगावण्यात आले आहे. जो पर्यंत तलांडे कुटुंबाला न्याय मिळत नाही तो पर्यंत स्वस्त बसणार नाही,आवश्यक भासल्यास आंदोलन, उपोषण करू.असे प्रतिक्रियेत म्हटले आहे.

Post a Comment
0 Comments