प्रणय भाऊ खुणे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
गडचिरोली :- राज्य सरकारने नुकताच निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी जिल्हा व तालुका स्तरावरील जिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी,तहसीलदार,नायब तहसीलदार. यांनी दर दिवशी सर्वसामान्य नागरिकांचे म्हणणे ऐकून घ्यावे व त्यांचे तक्रारीचे निरसन करावे याकरिता दररोज आपल्या कार्यालयामध्ये उपस्थित रहावे व तीन ते पाच वाजेपर्यंत सर्वसामान्यांना सेवा द्यावी,असे शासन निर्णय निर्गमित केलेले आहेत,या निर्णयानुसार आता जिल्हा व तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी, व म्हणणे ऐकून घेणार आहेत. याआधी सर्वसामान्य नागरिकांना याबाबत अनेक समस्याचा सामना करावा लागत होता,दूरच्या तालुक्यातून जिल्हास्तरावर, अथवा तालुका स्तरावर आल्यानंतर जिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार महोदय अनेकदा प्रशासनाच्या " व्हीसी "अथवा इतर आवश्यक प्रशासकीय मीटिंगमध्ये अथवा कार्यात व्यस्त असायचे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना न भेटताच आपल्या गावी परत जावे लागत होते, त्याचप्रमाणे तहसीलदार व नायब तहसीलदार अनेकदा प्रशासकीय कामे व इतर विषयांतर्गत अनुपस्थित असल्यामुळे तालुक्याच्या दूरवरून आलेल्या विविध गावातील नागरिक अबाल वृद्ध,अपंग व सर्वसामान्य गोरगरिबांची हेळसांड व्हायची, परंतु शासनाच्या या परिपत्रक निर्णयानुसार आता संबंधित जिल्हाधिकारी, उपविभागीय,अधिकारी तहसीलदार,नायब तहसीलदार यांना आता दररोज तीन ते पाच आपल्या प्रशासकीय कार्यालयात उपस्थित राहावे लागणार आहे. व सदर निर्णय राज्य सरकारने निर्गमित केलेला आहे.याबद्दल राष्ट्रीय मानवाधिकार संघटन (असो ) नवी दिल्ली यांनी राज्याचे मुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस व गडचिरोलीचे आमदार मिलिंद भाऊ नरोटे यांचे राष्ट्रीय मानवाधिकार संघटन प्रदेशाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे, उपाध्यक्ष भारत खटी,राहुल भाऊ झोडे , मार्गदर्शक देवानंद भाऊ खुणे, जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा ताई मडावी, संघटिका अनिता रॉय, स्नेहा मेश्राम, राणी गोपशेट्टीवार,भूषना ताई खेडेकर, उपाध्यक्ष नानू उपाध्ये,राकेश सरकार,किशोर कुंडू, महेश विस्वास, गडचिरोली तालुका अध्यक्ष मोरेश्वर कूनघाडकर, महेश विश्वास,कृष्णा वाघाडे, दिनेश मुजुमदार,पलास घरामी, सुमेन विस्वास, सोम वैद्य, तारक हलदार,जाहीर आभार मानले आहे.

Post a Comment
0 Comments