मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809
कुरखेडा:- साय- ₹क ग्लोबल रजिस्ट्री -२०२५ मध्ये जगातील उत्कृष्ट पाच टक्के शास्त्रज्ञांमध्ये निवड झालेले व मानाचे स्थान मिळविणारे गडचिरोली जिल्ह्यातील पहिले संशोधक ठरलेले मूळ गाव खरमतटोला येतील शास्त्रज्ञ डॉ. प्रकाश हलामी सध्या मूळ गावी आले असताना अनेकांच्या भेटीगाठी घेत देऊळगाव येतील शासन मान्यता असलेल्या नवसंजीवनी सार्वजनिक वाचनालयाला भेट दिली. वाचनालयाच्या वतीने डॉ. हलामी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सोबतच साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या संगीता संतोष ठलाल यांनी आपला स्वलिखित असलेला संशोधन ग्रंथ "रानभाज्यांच्या जगात" व झाडीचा खाजा" काव्यसंग्रह त्यांना भेट म्हणून दिला. त्यावेळी बोलताना डॉ.हलामी म्हणाले की, शोशल मीडियाच्या जमान्यात आजकाल वाचन संस्कृती लोप पावत आहे. पण,आज या छोट्याशा खेडेगावात व वाचनसंस्कृतीचे महत्व जाणून गावाच्या विकासासाठी सार्वजनिक वाचनालय खोलून गावासाठी खूप मोठे योगदान दिले आहेत. बघून फार आनंद झाला. सोबतच संगीता ठलाल यांचा "रानभाज्यांच्या जगात" संशोधन ग्रंथावर बोलताना म्हणाले हा नुसता ग्रंथ नसून सर्वच क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी फार मोठा आधार आहे. आजकाल खाद्यसंस्कृती तसेच अस्सल रानभाज्या नष्ट होत आहेत, त्यांचे संशोधन करून एक सामान्य शेतकरी, गृहीणी असताना सुद्धा संगीता ठलाल यांनी हा जिवन उपयोगी असलेला ग्रंथ काढून समाजासाठी मोलाचे योगदान दिले आहेत.
याचा प्रसार आणि प्रचार नुसते देशातच नाही तर जगात सुद्धा झाला पाहिजे अनेकांनी यासाठी पुढाकार घेऊन सर्वांपर्यंत हा ग्रंथ पोहोचविणे गरजेचे आहे.आज या छोट्याशा गावात सार्वजनिक वाचनालयाची सोय दिसते तसेच एक साहित्यिक व अभ्यासक घडलेला बघून अभिमान वाटतो. नवसंजीवनी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने माझा सन्मान केला व संगीता ठलाल यांनी आपले दोन पुस्तके भेट म्हणून दिली त्याबद्दल वाचनालयाचे , सर्वच पदाधिकाऱ्यांचे,त्यांच्या कुटुंबाचे आभार मानले.त्यावेळी गावातील प्रथम नागरिक सरपंच विजय तुलावी, वाचनालयाच्या सदस्या निर्मला ठलाल, राकेश खुणे, ,पुर्णा ठलाल,अनिल खुणे,श्रावण ठलाल प्रामुख्याने उपस्थित होते. शास्त्रज्ञ डॉ. प्रकाश हलामी यांनी वाचनालयाला भेट दिली व आपल्या अनुभवातून मोलाचे विचार व्यक्त केल्याबद्दल साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांनी त्यांचे आभार मानले.

Post a Comment
0 Comments