विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी मो. 9421856931
एटापल्ली : एटापल्ली तालुका अतिदुर्गम असून तालुक्यातील १९७ गावांतील रुग्ण उपचारासाठी एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात येतात. मात्र येथे परिचारिका (GNM) ची संख्या कमी असल्याने रुग्णसेवेवर परिणाम होत असल्याचा आरोप युवा सेना (शिंदे गट) लोकसभा प्रमुख धनंजय गहेरवार यांनी केला आहे.
या बाबत त्यांनी वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय एटापल्ली यांना निवेदन दिले. १५ दिवसांच्या आत रिक्त परिचारिका पदे भरावीत, अन्यथा रुग्णालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

Post a Comment
0 Comments