युवा प्रतिष्ठान रायगडच्या वतीने काळीजे गावात समाजोपयोगी उपक्रम
✍️ दिलीप करकरे ✍️
माणगाव, रायगड
7208708456
श्रीवर्धन : गौरी गणपती उत्सवानिमित्त युवा प्रतिष्ठान रायगड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला शैक्षणिक उपक्रम दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी काळीजे गाव, ता. श्रीवर्धन येथे उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक, कला व क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवा प्रतिष्ठान रायगडच्या या उपक्रमाला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाला काळीजे गावातील ग्रामस्थ तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंबई परिसरातूनही विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहून या समाजोपयोगी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. गौरी गणपती उत्सवाच्या आनंदाला सामाजिक बांधिलकीची जोड देत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
युवा प्रतिष्ठान रायगड – स्थापना २०२२ ही संस्था मागील दोन वर्षांपासून शैक्षणिक उपक्रम, रक्तदान शिबिरे तसेच विविध समाजोपयोगी कार्यक्रम सातत्याने राबवत आहे. समाजातील गरजू घटकांपर्यंत शिक्षण, आरोग्य आणि विविध प्रकारची मदत पोहोचविण्याच्या उद्देशाने संस्थेचे कार्य सुरू आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन मिळावे आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत.
युवा प्रतिष्ठान रायगडच्या या सातत्यपूर्ण समाजोपयोगी कार्याची दखल घेत काळीजे गावातील स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ आणि ज्येष्ठ नागरिकांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. ग्रामीण भागात अशा प्रकारचे शैक्षणिक व सामाजिक उपक्रम नियमितपणे राबविणे ही काळाची गरज असून, युवा पिढीने समाजकार्यात पुढाकार घेणे प्रेरणादायी असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या शैक्षणिक उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी युवा प्रतिष्ठान रायगडचे संस्थापक श्री. अमर शंकर खेरटकर, उपाध्यक्ष श्री. गणेश निर्मळ, सचिव व संघटक प्रमुख श्री. मयूर शिगवण, सल्लागार श्री. निशांत शिगवण, विभाग संघटक प्रमुख श्री. विशाल सावंत, तालुका संघटक प्रमुख श्री. नितेश बोले, कार्यकारणी सदस्य श्री. शैलेश पवार, श्री. मयूर गजमल, काळीजे गावचे अध्यक्ष श्री. रविंद्र शिगवण साहेब, दत्त मंदिरचे खजिनदार श्री. दशरथ पवार साहेब, मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. शांताराम मळेकर साहेब, श्री. राजेश शिगवण साहेब तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.
गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमातून शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवेचा संदेश देण्यात आला. समाजातील गरजू घटकांपर्यंत विविध समाजोपयोगी उपक्रम पोहोचविण्याचा युवा प्रतिष्ठान रायगडचा संकल्प असून, भविष्यातही अशाच प्रकारचे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा निर्धार संस्थेच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
सेवा, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीचा वसा जपत युवा प्रतिष्ठान रायगडची समाजोपयोगी वाटचाल अशीच सुरू राहणार असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Post a Comment
0 Comments