Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

सेवा संकल्प अभियानांतर्गत घिमणिया येथे एकल महिलांसाठी विशेष कॅम्प उत्साहात संपन्न




अरविंद बेंडगा 

पालघर जिल्हा प्रतिनिधी 

7798185755


घिमणिया, ता. तलासरी, जि. पालघर : सेवा संकल्प अभियानांतर्गत ग्रामपंचायत घिमणिया येथे दिनांक 21 सप्टेंबर 2026 रोजी एकल महिलांसाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले. एकल महिलांना शासनाच्या विविध योजना, सेवा व सुविधांचा लाभ मिळवून देणे तसेच त्यांच्या विविध समस्या व अडचणींचे निराकरण करण्याच्या उद्देशाने या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.


या कॅम्पमध्ये विधवा, घटस्फोटीत, परितक्त्या तसेच 40 वर्षांवरील अविवाहित महिला यांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. पात्र लाभार्थी महिलांकडून आवश्यक कागदपत्रांची माहिती घेऊन शासनाच्या विविध योजना व सेवांचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.


कार्यक्रमास ग्रामपंचायत घिमणियाचे सरपंच श्री. धर्मेश अंधेर, बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री. सतीश पोळ, मंडळ अधिकारी श्री. राजू दामोडे, पशुसंवर्धन अधिकारी श्री. मंदार पटेल, मुख्य सेविका श्रीमती  गीता शैलेश गोंधळेकर तसेच रुपाली राणा,माधुरी मॅडम,प्रियांका,ओझरे मॅडम यांच्यासह गावातील सर्व अंगणवाडी सेविका, आशा सेविका तसेच महसूल, आरोग्य, ग्रामविकास, कृषी, महिला व बालकल्याण आणि पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


यावेळी संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकल महिलांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन त्यांना उपलब्ध असलेल्या सेवा-सुविधांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन केले. महिलांच्या अडचणी व समस्यांवर संबंधित विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.


एकल महिलांना शासनाच्या योजनांचा लाभ त्यांच्या गावातच मिळावा आणि त्यांना विविध शासकीय सेवांसाठी अनावश्यक अडचणींचा सामना करावा लागू नये, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कॅम्पला146 महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच ग्रामविकास अधिकारी श्री. चंद्रकांत पाटील याच्या सहकार्याने कार्यक्रम व्यवस्थित पार पडला.

Post a Comment

0 Comments