Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

SBC समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानावर धरणे आंदोलन




प्रमोद एन. चिंतलवार 

तालुका प्रतिनिधी गडचिरोली 

मो. नं. 9405133420


गडचिरोली : SBC अन्याय निवारण कृती समिती, महाराष्ट्रतर्फे SBC समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर २३ सप्टेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात आले.


उच्च शिक्षणात SBC समाजासाठी २ टक्के स्वतंत्र आरक्षण, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे व १० आश्रमशाळांची निर्मिती, २ टक्के राजकीय आरक्षण, तातडीने जात पडताळणी प्रमाणपत्रे देणे, स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे, पदोन्नतीचा लाभ देणे तसेच विणकर आर्थिक विकास महामंडळाचे कामकाज सुरू करणे, अशा विविध मागण्या आंदोलनादरम्यान करण्यात आल्या.


आंदोलनानंतर समितीच्या शिष्टमंडळाने सचिव श्री. आप्पासो धुळाज (IAS) आणि उपसचिव डॉ. वसंत माने यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. या मागण्यांवर पुढील कार्यवाही करण्यासाठी ५ ऑक्टोबर २०२६ रोजी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे.


मागील वर्षी १९ जून रोजी सचिव श्री. आप्पासो धुळाज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर SBC समाजाच्या काही मागण्यांवर प्रगती झाल्याचे समितीने यावेळी नमूद केले.


आंदोलनाचे नेतृत्व समितीचे अध्यक्ष सुरेश पद्मशाली, सरचिटणीस जितेंद्र कांचानी, सुदर्शन बोगा, रमेश तुम्मा, रामकृष्ण पोट्टाबतिनी आणि मल्लेशम कोंका यांनी केले. यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.


SBC समाजाच्या हक्कांच्या मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन प्रलंबित मागण्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी समितीतर्फे करण्यात आली.

Post a Comment

0 Comments