Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

बांडीया नदीत बुडून एकाचा दुर्दैवी मृत्यू; घटनास्थळी पंचनामा पूर्ण

 


विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी मो. 9421856931

एटापल्ली : तालुक्यातील बांडीया नदीच्या पात्रात बुडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज, दिनांक १२ ऑक्टोबर २०२६ रोजी उघडकीस आली आहे. *मासा पेंदा कूदयेटी* असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मासा पेंदा कूदयेटी यांचा बांडीया नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच महसूल व ग्रामपंचायत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. येथील बांडीया नदीच्या किनाऱ्यावर पोहचून अधिकाऱ्यांनी घटनेची सविस्तर पाहणी केली व मौका चौकशी करून रीतसर पंचनामा केला.


पंचनाम्यादरम्यान घटनास्थळी ग्रामपंचायत अधिकारी *संजय गेडाम, महसूल सेवक मोहन उसेंडी, संतोष चांदेकर* यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांनी व संबंधित अधिकाऱ्यांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.


अचानक घडलेल्या या घटनेमुळे मृतकाच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments