तातडीने सेवा पूर्ववत करण्याचे नागरिकांचे संबंधित विभागाला आवाहन. मोबाईल धारक कमालीचे त्रस्त.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
सिरोंचा =पेंटीपाका.
सिरोंचा तालुका मुख्यालयापासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर असलेल्या पेंटीपाका येथे कमी व्होल्टेजच्या समस्येमुळे गेल्या तीन दिवसांपासून BSNL मोबाईल सेवा ठप्प असल्याने नागरिकांना मोठ्या प्रचंड अडचणीनां सामना करावा लागत आहे. दूरसंचार सेवा बंद असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसल्याने नागरिकांचा एकमेकांशी संपर्क तुटला असून, दैनंदिन कामकाजावरही परिणाम झाला आहे. ऑनलाइन शासकीय कामे, बँकिंग व्यवहार, डिजिटल सेवांचा वापर तसेच इतर महत्त्वाच्या कामांसाठी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागात मोबाईल सेवा ही संपर्काचे महत्त्वाचे साधन असताना सलग तीन दिवस सेवा बंद राहिल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
कमी व्होल्टेजच्या समस्येकडे संबंधित विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
पेंटीपाका येथील BSNL सेवा कमी व्होल्टेजमुळे प्रभावित झाल्याचे सांगण्यात येत असून, या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. तीन दिवस उलटूनही सेवा पूर्ववत न झाल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. संबंधित विभागाने तांत्रिक अडचणींची तपासणी करून मोबाईल सेवा लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
नागरिकांचे स्पष्ट आवाहन
पेंटीपाका येथील BSNL मोबाईल सेवा तातडीने पूर्ववत करावी, कमी व्होल्टेजची समस्या कायमस्वरूपी दूर करावी आणि भविष्यात अशा प्रकारे वारंवार सेवा ठप्प होणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन नागरिकांनी संबंधित विभागाला केले आहे.
नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेली दूरसंचार सेवा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी संबंधित विभागाने गांभीर्याने घ्यावी. तीन दिवसांपासून बंद असलेली BSNL सेवा तातडीने सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी पेंटीपाका येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Post a Comment
0 Comments