मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420851809.
आजपर्यंत. पत्रकारांनी बातम्या लावल्या, पण प्रशासनाने डोळे झाकले..आणि इतर माध्यमांनी जयस्तंभाच्या बाजूच्या या मुख्य रस्त्याच्या दुरवस्थेवर वारंवार आवाज उठवला, पण प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे नागरिकांना रोजच मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.
पण भाग्यश्री ताई आत्राम यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून, त्यांच्या पुढाकाराने आणि कार्यकर्त्यांच्या श्रमदानातून या रस्त्यावर GSB टाकून सर्व खड्डे बुजवण्यात आले आहेत.
🔥 प्रशासनाला कडक इशारा:
"वर्षांनुवर्षे फक्त पोकळ आश्वासने देणाऱ्यांमुळे नागरिकांचा त्रास कमी होत नाही! ताई आत्राम यांच्या एकाच पुढाकाराने थेट कृती करून दाखवली. प्रशासनाला जे आतापर्यंत जमले नाही, ते कार्यकर्त्यांनी श्रमदानातून करून दाखवले! जयस्तंभाच्या बाजूच्या रस्त्यावरील खड्डे बुजवून नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. वाढदिवसाचा सर्वात मोठा आणि आदर्श उपक्रम म्हणजेच हे श्रमदान!"
भाग्यश्री ताई आत्राम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Post a Comment
0 Comments