घनकचरा कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असल्याने स्वच्छतेची जबाबदारी घेणार कोण? नागरिकांचा संतप्त सवाल!
एटापल्ली : शहरातील वीर बाबुराव शेडमाके चौकात कालपासून मृत कुत्रा पडून असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिक, व्यापारी आणि ये-जा करणाऱ्या लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, नगरपंचायतीचे घनकचरा व्यवस्थापन कर्मचारी आंदोलनावर असल्याच्या पार्श्वभूमीवर या समस्येकडे लक्ष देणार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरातील प्रमुख चौकातच मृत प्राण्याची विल्हेवाट लावली जात नसेल, तर स्वच्छतेची जबाबदारी नेमकी कोणाची? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
मृत कुत्र्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असताना संबंधित प्रशासन आणखी किती वेळ गप्प राहणार? नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वी नगरपंचायत प्रशासनाने तातडीने दखल घेऊन मृत कुत्र्याची योग्य विल्हेवाट लावावी आणि परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.
प्रश्न एकच — आंदोलनामुळे शहराची स्वच्छता वाऱ्यावर सोडली जाणार का?
नगरपंचायत प्रशासनाने तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे.

Post a Comment
0 Comments