अरविंद बेंडगा
पालघर जिल्हा प्रतिनिधी
7798185755
जव्हार : अंबिका माता सामाजिक व शैक्षणिक सेवाभावी संस्थेच्या वतीने जव्हार तालुक्यातील हुंबरण येथील शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, या उद्देशाने संस्थेच्या वतीने हा स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ देऊन त्यांना प्रोत्साहित करण्यात आले. समाजातील गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊन त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. संतोष भावर, कलाकार महेश बेलकर, नितेश गावित, केनू कोती, प्रमिला कोती, मनीषा गावित, ज्योती मॅडम तसेच पत्रकार संतोष ठाकरे यांनी सहकार्य केले.
अंबिका माता सामाजिक व शैक्षणिक सेवाभावी संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेला हा पहिला सामाजिक व शैक्षणिक उपक्रम असून, भविष्यातही गरजू विद्यार्थी आणि समाजातील वंचित घटकांसाठी विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस आहे.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. समाजसेवेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे आणि शिक्षणाला प्रोत्साहन देणे, हेच संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
जय अंबिका माता!

Post a Comment
0 Comments