Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

भगवंतराव आश्रम शाळेतील विध्यार्थी रवींद्र भंडारवार समाज कल्याण अधिकारी पदावर.



शाळेचे मुख्याध्यापक टी. सी ओडनालवार यांच्याकडून जाहीर सत्कार.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

अहेरी :- भगवंतराव आश्रम शाळा राजाराम (खां)येथे शिक्षण घेत असलेले इयत्ता पाचवी ते सातवी पर्यंत शिक्षण घेऊन त्या नंतर पुढील शिक्षण घेऊन वाशिम येथे समाज कल्याण अधिकारी म्हणून पदावर रुजू झाल्यानंतर आपल्या जुन्या शाळेतील शिकवलेल्या शिक्षकांना भेटायला आलेले  रविंद्र भंडारवार यांचे जाहीर सत्कार शाळेचे मुख्याध्यापक  टी. सी. ओडनालवार व तसेच शाळेतील संपूर्ण कर्मचाऱ्यांनी  सत्कार केले असून  रविंद्र भंडारवार समाज कल्याण अधिकारी यांनी  ओडनालवार सर व तसेच बत्तूलवार सर यांच्यामुळे घडलो असे त्यांनी आपले मनोगतात सांगितले आहे.

या वेळी शिक्षकवृंद वासाडे सर, गोंडाने सर,मेश्रामसर,कापटे सर , पठाण सर , बत्तूलवार सर , मडावी सर ,अधीक्षक, गेडाम, अधिक्षिका आत्राम, पठाण, अनिल आत्राम, जाकेवार, पेद्दापल्ली, राचारलावार, बोम्मावार,चिंतावार, आदी मान्यवरंचा हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments