Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

कढोली बु.च्या मुख्य चौकात स्पीड ब्रेकरची मागणी

 



रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; पियुष हिंगाणे यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन


          संतोष मेश्राम 

    चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी 

     मो न 9923497800


राजुरा तालुक्यातील कढोली बु. येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील मुख्य सिमेंट काँक्रीट रस्त्यावर खड्डे पडल्याने नागरिकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच गावातील मुख्य चौकात वाहनांची वर्दळ अधिक असून, स्पीड ब्रेकर नसल्याने अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्याची दुरुस्ती करून मुख्य चौकाच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी एक, असे दोन स्पीड ब्रेकर उभारण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.


यासंदर्भात भाजयुमोचे राजुरा तालुका ग्रामीण सचिव पियुष पुरुषोत्तम हिंगाणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांना दि. १८ ऑक्टोबर रोजी लेखी निवेदन दिले.


निवेदनात कढोली बु. येथील मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास तसेच वारंवार अपघात होत असल्याची बाब नमूद करण्यात आली आहे. गावातील मुख्य चौकात वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी स्पीड ब्रेकरची आवश्यकता असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.


संबंधित विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती करावी आणि चौकाच्या दोन्ही बाजूंना स्पीड ब्रेकर उभारण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी विनंती हिंगाणे यांनी निवेदनातून केली आहे.

Post a Comment

0 Comments