Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

धानिवरीत हाय-रीच सिड्स कंपनीच्या भात पीक पाहणीला उत्स्फूर्त प्रतिसाद




MDR-4001 आणि MDR-44 मुस्कान वाणांची वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी २०० शेतकऱ्यांची उपस्थिती; कापणीसाठी विळ्यांचे वाटप


अरविंद बेंडगा 

पालघर जिल्हा प्रतिनिधी

7798185755


डहाणू तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत धानिवरी येथे हाय-रीच सिड्स कंपनीच्या वतीने भात पीक पाहणी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात कंपनीच्या MDR-4001 आणि MDR-44 मुस्कान या भात वाणांची पाहणी करण्यात आली. तसेच या वाणांची वैशिष्ट्ये, पीक कालावधी, फुटव्याची क्षमता आणि उत्पादनासंदर्भात शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाला सुमारे १९० ते २०० शेतकऱ्यांनी उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


MDR-4001 या वाणाचा पीक कालावधी ९० ते १०० दिवस, तर MDR-44 मुस्कान या वाणाचा पीक कालावधी ११० ते ११५ दिवस असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. चांगला फुटवा आणि भरघोस उत्पादनाची क्षमता ही या वाणांची प्रमुख वैशिष्ट्ये असल्याचे कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले. भात कापणीचे दिवस जवळ आल्याने कंपनीतर्फे उपस्थित शेतकऱ्यांना विळ्यांचे वाटप करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती.


या कार्यक्रमाला ग्रुप ग्रामपंचायत धानिवरीचे सरपंच शैलेश कोरडा, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, हाय-रीच सिड्स कंपनीचे जनरल मॅनेजर राजेश शर्मा, रीजनल मॅनेजर राहुल पवार, कंपनी प्रतिनिधी संदीप अनारसे, पालघर टेरिटरी मॅनेजर चेतन मोरे, कंपनीचे प्रतिनिधी गणेश पडवले आणि अजय निकोले उपस्थित होते.


यावेळी कंपनीचे जनरल मॅनेजर राजेश शर्मा यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना MDR-4001 आणि MDR-44 मुस्कान या वाणांची जास्तीत जास्त लागवड करण्याचे आवाहन केले. हे वाण अधिक उत्पादनासाठी उपयुक्त असून रोगांना बळी पडण्याची शक्यता कमी असल्याचे त्यांनी सांगितले.


या पीक पाहणी कार्यक्रमामुळे MDR-4001 आणि MDR-44 मुस्कान या भात वाणांविषयी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढण्यास मदत झाली आहे. आगामी काळात या वाणांच्या लागवडीला शेतकऱ्यांकडून अधिक पसंती मिळेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Post a Comment

0 Comments