नागपूर प्रतिनिधी
गुरुनाथ तिरपणकर
नागपूर :- सर्व समाज बांधवांना आणि भगिनींना सतीश दाभाडे यांचा मनःपूर्वक नमस्कार अखिल महाराष्ट्र कोष्टी समाज परिषदेच्या वतीने येवला, जिल्हा नाशिक, येथील माता चौंडेश्वरी च्या साक्षीने आणि सर्व संमतीने माझी प्रदेशाध्यक्ष म्हणून दिनांक 11 सप्टेंबर 2022 रोजी निवड झाली होती.उपस्थित सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांनी, सदस्यांनी माझी प्रदेशाध्यक्षपदी एक मताने जेव्हा माझी निवड केली तेव्हाच खऱ्या अर्थाने मी भारावून गेलो होतो.प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी आपण सांभाळू किंवा नाही?! याबाबत, मी स्वतः चिंताग्रस्त होतो. परंतु, चौंडेश्वरी मातेच्या कृपेने आणि सर्व समाज बांधवांच्या सहकार्याने मी माझा कार्यकाळ पूर्ण करू शकलो याचे मला समाधान आहे.गेल्या दोन वर्षांपूर्वी कमरेच्या त्रासामुळे माझ्या स्पाईनची मला शस्त्रक्रिया करावी लागली. डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे मी बरेच महिने बेडवरच होतो.बाहेरचा प्रवास मी करू शकत नव्हतो, अशावेळी आपण आता प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी इतर कोणावर द्यावी असा विचार माझ्या मनामध्ये आला होता ,सदर विचार मी आदरणीय श्री. अरुण भाऊ वरोडे, यांच्याकडे व्यक्तही केला होता, परंतु त्यांनी नम्रतेने नकार दिला. जेवढे काम होईल तेवढे करा बाकी आम्ही सांभाळून घेतो असा विश्वास त्यांनी दिल्यानंतर मी माझ्या शारीरिक क्षमतेनुसार व शस्त्रक्रियेची अडचण लक्षात घेऊन फक्त विदर्भात परिषदेचे कार्य करण्याचा ठाम निर्णय घेतला.---!!! तत्पूर्वी, माझी प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संपूर्ण राज्यातील पदाधिकाऱ्यांची नेमणूक परिषदेच्या सर्व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.राज्यस्तरीय, विभागस्तरीय, तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका, सोबतच महिला पदाधिकाऱ्यांच्या, युवा पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका हा सुद्धा संघटनेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा भाग असल्यामुळे महिला अध्यक्ष आणि युवा अध्यक्षांना सोबत घेऊन त्याही नेमणुका करण्यात आल्या.विशेष महत्त्वाचे म्हणजे, बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी पदे मिळण्याबाबत माझ्याकडे आग्रह केला. आणि माझ्या दृष्टीने हा आग्रह संघटनेच्या उत्साहात भर टाकणारा होता.सर्व पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्यानंतर परिषदेच्या धोरणानुसार नागपूर, येथील एका प्रशस्त हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित करून सर्वांना सामूहिक शपथ देण्याचा कार्यक्रम आणि पदभार स्वीकारण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.याच कार्यक्रमांमध्ये विदर्भातील मान्यवर समाज बांधवांचा, दिवंगत समाज बांधवांचा सन्मान स्मृतीचिन्ह देऊन करण्यात आला.विशेष म्हणजे या कार्यक्रमाकरिता फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री. अरुण भाऊ वरोडे, हे स्वतः उपस्थित होते.राज्यातील जवळजवळ-चारशे प्रतिनिधी या पदग्रहण समारंभाच्या कार्यक्रमा करिता आवर्जून उपस्थित होते. त्यानंतर, परिषदेच्या वतीने विदर्भातील तरुणांना रोजगार मिळावा, त्यांनी स्वतः व्यवसाय करावा याकरिता महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे सहकार्य घेऊन नागपूर, येथील औद्योगिक परिसरा मध्ये असलेल्या त्यांच्या कार्यालयामध्ये एक दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेमध्ये विदर्भातील 50 ते 60 युवक आणि युवती सहभागी झाले होते.महा ज्योती, च्या मार्फत एसबीसी संवर्गातील विद्यार्थ्यांना सवलती प्राप्त आहे. या सवलती एसबीसी संवर्गातील सर्व विद्यार्थ्यांना वेळोवेळी मिळाव्यात याकरिता संबंधित महाज्योतीच्या महासंचालकांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देण्यात आले.भेटीच्या माध्यमातून दिलेल्या लेखी निवेदनामुळे महा ज्योतीच्या कार्यालयाने सुद्धा एसबीसीच्या विद्यार्थ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न केला. मुंबई-- ठाणे येथील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रथमच आयोजित केलेल्या कार्यक्रमास माझ्यासह राष्ट्रीय अध्यक्ष, आणि इतर जेष्ठ पदाधिकारी सुद्धा ठाणे या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते. नागपूर येथेच माझ्या कमल सेलिब्रेशन मध्ये राज्यस्तरीय कार्यशाळा सुद्धा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये तरुणांचा सहभाग लक्षणीय होता.नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना विनकर महामंडळ स्थापन करण्याबाबत लेखी निवेदनाच्या माध्यमातून विनंती करण्यात आली. आणि कालांतराने शासनाने विणकर महामंडळ स्थापन करण्याची घोषणा सुद्धा केली.इतकेच नव्हे तर, एसबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा कायदेशीर धक्का लागणार नाही याबाबत सुद्धा पुढच्या हिवाळी अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय सामाजिक न्याय मंत्री, विविध लोकप्रतिनिधी, यांना लेखी निवेदन परिषदेच्या वतीने देण्यात आले.----७ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण देशात हातमाग आणि विणकर दिन म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने परिषदेच्या वतीने संपूर्ण राज्यात वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हातमाग दिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केल्या गेला.यामध्ये प्रामुख्याने, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या समाज बांधवांचा सत्कार, ज्येष्ठ समाज बांधवांचा आणि भगिनींच्या सत्काराचे आयोजन, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, कुठे कुठे चर्चासत्र, व्याख्याने, समाज एक संघ ठेवण्यासंदर्भात कार्यक्रम, प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.महिला संघटनेच्या वतीने सुद्धा संपूर्ण राज्यात वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन वेळोवेळी करण्यात आले. विशेषता, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येवला या ठिकाणी भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला.युवा संघटनेच्या वतीने सुद्धा युवा अध्यक्षांनी पुढाकार घेऊन सोलापूर, सारख्या शहरांमध्ये संपूर्ण राज्यातील कर्तृत्ववान मुलांचा सत्कार सोहळा आयोजित केला.हे कार्यक्रम निश्चितच परिषदेच्या वैभवा त आणि कार्यात भर घालणारे होते.महिला अध्यक्षांनी तर आपला नोकरी पेशा सांभाळून संपूर्ण राज्यात महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी जीवाचे रान केले.युवा अध्यक्षांनी सुद्धा समाजातील युवक परिषदेच्या कार्यात कसे जोडल्या जाईल याबाबत सातत्याने प्रयत्न केले. काही ठिकाणी प्रोफेशनल ग्रुपच्या माध्यमातून सुद्धा समाज बांधवांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आले. समाजामध्ये जे व्यावसायिक बांधव आहेत त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न प्रोफेशनल ग्रुपच्या माध्यमातून सातत्याने करण्यात आला.बऱ्याच ठिकाणी विशेषता ज्या ठिकाणी समाज बांधव मोठ्या संख्येने आहेत त्या ठिकाणी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने कार्यक्रम घेतले. काही ठिकाणी परिषदेचे सहकार्य घेऊन वर वधू परिचय मेळावे सुद्धा भव्य प्रमाणात आयोजित करण्यात आले.गेल्या वर्षी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विदर्भातील दारव्हा, जिल्हा यवतमाळ, या ठिकाणी भव्य प्रमाणात महिला मेळावा परिषदेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाकरिता समाजाचे धर्मगुरू आदरणीय परमपूज्य श्री. श्री. श्री. दयानंद पुरी स्वामी महाराज, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय पदाधिकारी, राज्यस्तरीय पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. याच कार्यक्रमांमध्ये संपूर्ण राज्यातील जवळजवळ ६० कर्तुत्वान महिलांचा परमपूज्य स्वामीजींच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.याच कार्यक्रमांमध्ये, समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या काही मान्यवर पुरुषांचाही परिषदेच्या वतीने सन्मान करण्यात आला. परिषदेच्या वतीने दारव्हा, या ठिकाणी कोष्टी समाजाची काशी करण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला. हा संकल्प सुद्धा येत्या काही दिवसात तडीस जाईल याचा आम्हाला विश्वास आहे. अचलपूर, जिल्हा अमरावती, येथील समाज बांधवांनी अचलपूर या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमा मध्ये सुद्धा समाजाचे धर्मगुरू, राष्ट्रीय अध्यक्ष आणि परिषदेचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने मी हजर होतो.सूरताल, या समाजातील सांस्कृतिक समूहाला सुद्धा बळ देण्याचे काम परिषदेने कायमस्वरूपात केले. या माध्यमातूनच आपल्या समाजातील कलावंतांचा परिचय होण्यास मदत झाली. समाजामध्ये आज असंख्य समस्या आहेत त्या समस्येवर सविस्तर चर्चा व्हावी म्हणून यवतमाळ या ठिकाणी दोन दिवसाची कार्यशाळा सुद्धा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. परंतु, स्थानिक आयोजकांना याबाबत असंख्य अडचणी आल्यामुळे सदर कार्यशाळा नियोजित वेळेत होऊ शकली नाही परंतु या अनुषंगाने समाजाच्या समस्येवर सातत्याने चर्चा करण्यात आली. नागपूर येथील स्थानिक संघटनेचे सहकार्य घेऊन परिषदेने सातत्याने वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले.बऱ्याच कार्यक्रमात राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यस्तरीय पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. लातूर, येथील चौंडेश्वरी फाउंडेशनच्या उपक्रमास सातत्याने प्रेरित करण्याचा प्रयत्न केला. समाजातील ज्या कर्तुत्वान पुरुष किंवा महिला मंडळीचा वाढदिवस असेल तर त्यांच्या कार्याचा परिचय सर्व समाजाला व्हावा या अनुषंगाने परिषदेच्या वतीने प्रयत्न केला. माझ्या, कार्यकाळात मी समाजाची सेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. बऱ्याच दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदत करण्यास मागेपुढे पाहिले नाही. सर्वांच्या सहकार्यामुळे प्रत्येक कार्यक्रम परिषद यशस्वी करू शकली.राज्यातील पदाधिकाऱ्यांनी सुद्धा माझ्या प्रत्येक कृतीचे समर्थन केले. मनापासून पाठिंबा दिला,प्रसंगी शाबासकी सुद्धा दिली. सर्व आर्थिक व्यवहार पारदर्शक करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. संपूर्ण राज्यातील समाज बांधवांनी सुद्धा परिषदेच्या प्रत्येक कार्यात सहभागी होण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला. महिला संघटना, युवा संघटना, प्रोफेशनल ग्रुप यांनी सुद्धा वेळोवेळी मला व परिषदेला मनापासून सहकार्य केले. राष्ट्रीय फेडरेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी मनापासून सहकार्य केले. प्रसिद्धी विभागाची जबाबदारी ज्या पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली होती त्या सर्व प्रसिद्धी प्रमुखांनी परिषदेच्या कार्याची वेळोवेळी प्रसिद्धी दिली. नागपूर, वाशिम, येथील समाज बांधवांनी तर मला सातत्याने सहकार्य केले. आज, माझ्या कार्याचा शेवटचा दिवस आहे. पुढील अध्यक्ष सुद्धा परिषदेचे कार्य अतिशय जोमाने करतील असा विश्वास मला आहे. आदरणीय श्री. अरुण भाऊ वरोडे, आदरणीय श्री. नारायणराव वड्डे, आदरणीय श्री. पंडितराव इदाते, आदरणीय श्री. विष्णू भाऊ कुटे, आदरणीय श्री. रमेश भाऊ घटे, आदरणीय श्री. अशोकराव सपाटे, आदरणीय सौ. मंदाकिनी ताई टकले, युवा अध्यक्ष श्री. विजय कलढोने, आणि राज्यातील आपल्या समाजाच्या सर्व संस्था त्यांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्यां, युवा कार्यकर्ते व हितचिंतक या सर्वांचे मी मनापासून आज जाहीर आभार मानत आहे .🙏 पुनश्च, सर्व समाज बांधवांना, भगिनींना मला जी समाजाची सेवा करण्याची संधी आपण उपलब्ध करून दिली आणि या माध्यमातूनच सर्वांनी मला भरभरून प्रेम दिले, आशीर्वाद दिले त्याबद्दल जाहीर आभार! आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समाजाचे धर्मगुरू आदरणीय श्री. श्री. श्री. दयानंद पुरी स्वामी महाराज यांनी मला कायम आशीर्वाद देऊन प्रेरित केले त्याबद्दल स्वामीजींचेही मनापासून आभार.!!!!---
या पुढे ही तुमच्या सोबतच असणार आहे, राज्यात व राष्ट्रीय पातळीवर संघटनेचे कार्य तनमनधनाने करीत राहीन याची ग्वाही या निमित्ताने देत आहे.

Post a Comment
0 Comments