परसलगोंदी - बांदे येथील कक्ष क्र. 273 अतिक्रमणमुक्त; विभागाची मोठी यशस्वी मोहीम
विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी मो. 9421856931
भामरागड वनविभागाने अतिक्रमणधारकांवर मोठी कारवाई करत एटापल्ली परिक्षेत्रातील अतिक्रमण हटविले आहे.
मा. शैलेश मीना, उपवनसंरक्षक भामरागड यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री दीपक रामटेके, सहाय्यक वनसंरक्षक भामरागड तथा श्रीमती निलीमा खोब्रागडे, वनपरिक्षेत्र अधिकारी एटापल्ली यांच्या नेतृत्वात ही संयुक्त कारवाई पार पडली.
पॉइंट वाईज माहिती -
१. कारवाई कुठे झाली?
उपक्षेत्र परसलगोंदी, नियतक्षेत्र बांदे येथील कक्ष क्रमांक 273 मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून असलेले अतिक्रमण हटविण्यात आले.
२. कारवाई कधी झाली?
दिनांक 13/10/2026 रोजी सकाळी 9:00 वाजता वनपरिक्षेत्र कार्यालय एटापल्ली येथून सर्व कर्मचारी गणवेशात (डांगरी) घटनास्थळी रवाना झाले होते.
३. मोहिमेत कोणी सहभाग घेतला?
या मोहिमेत वनपरिक्षेत्रातील 19 कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये कायते, नागोसे, चौधरी, पवार, राठोड, कैलास मडावी, कवी भांडेकर, अमर कन्नाके, सचिन तोराम, राजेश्वर देशमुख, अतुल कातलाम, रोशन नैताम, अर्जुन वेळदा, राकेश मडावी, रंजू कोवासी, गुणी गावळे, सुशीला आतला, सुजाता अडगोपुलवार, भाग्यश्री सराटे यांचा समावेश होता.
४. प्रशासनाचा इशारा -
वनक्षेत्रातील अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही. भविष्यातही अशाच प्रकारे अतिक्रमणावर धडक कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा वनपरिक्षेत्र अधिकारी एटापल्ली यांनी दिला आहे.
या यशस्वी कारवाईमुळे वनविभागाची वनसंरक्षणाप्रती असलेली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Post a Comment
0 Comments