‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत सामाजिक बांधिलकी जपत अधिकारी-कर्मचाऱ्यांचा स्तुत्य उपक्रम
संतोष मेश्राम
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मो न 9923497800
राजुरा, दि. १२ ऑक्टोबर २०२६ : जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत ‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून पंचायत समिती राजुरा येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या शिबिरात पंचायत समितीतील एकूण २९ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
तुकडोजी महाराज सभागृह, पंचायत समिती राजुरा येथे आयोजित या शिबिराचे उद्घाटन गटविकास अधिकारी डॉ. रेजिवाड साहेब व सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. ताजने साहेब यांच्या शुभहस्ते लाल फीत कापून करण्यात आले. यावेळी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
रक्तदान हे श्रेष्ठ दान असून, गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. याच सामाजिक जाणिवेतून पंचायत समिती राजुरा येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदानासाठी पुढाकार घेतला. या उपक्रमामुळे रक्तदानाविषयी जनजागृती होण्यास तसेच समाजात सेवाभावाची भावना वृद्धिंगत होण्यास मदत झाली.
या कार्यक्रमाला खंडविकास अधिकारी व कर्मचारी वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले. यामध्ये श्री. संजीव इनमुलवार, विस्तार अधिकारी आरोग्य, श्री. विनोद मेश्राम, विस्तार अधिकारी पंचायत, श्री. लालाजी पोवरे, व्ही. ए. कृषी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Post a Comment
0 Comments