राजेंद्र झाडे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो 9518368177
गोंडपिपरी.,:- मध्यचांदा वनविभाग, वनपरिक्षेत्र धाबा यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून गोंडपिपरी शहरात आज दिनांक ३ ऑक्टोबर भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. वन्यजीवांचे रक्षण, पर्यावरणाचा समतोल आणि वनसंपदेचे जतन याविषयी नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणे हा या रॅलीचा मुख्य उद्देश होता.
या रॅलीत जनता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्स्फूर्त आणि शिस्तबद्ध सहभाग नोंदवला. रॅलीची सुरुवात जनता विद्यालयाच्या प्रांगणातून झाली. तेथून शहराच्या मुख्य मार्गावरून जात वन्यजीवांच्या संरक्षणाचे महत्त्व सांगणारे फलक हातात धरून विद्यार्थ्यांनी 'वन्यजीव वाचवा, पर्यावरण वाचवा' अशा विविध आकर्षक घोषणा दिल्या. यामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
या प्रसंगी जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक कोकाटे सर व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. वनविभागाच्या वतीने के.पी. गौरकार (वनपरीक्षेत्र अधिकारी), बी.टी. पुरी (क्षेत्र सहाय्यक, गोंडपिंपरी), पेंदोर (क्षेत्र सहायक, धाबा), आवळे (वनपाल) तसेच नागरे, झारखंडे, कातकर, मेश्राम, बोकडे, भिवापुरे, मारगोनीवार (सर्व वनरक्षक) यांची प्रमुख उपस्थिती होती.
या जनजागृती उपक्रमात धाबा वनपरीक्षेत्रातील सर्व वनमजूर, रोजंदारी मजूर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीच्या यशस्वी आयोजनामुळे स्थानिक नागरिकांमध्ये वन्यजीव संवर्धनाबाबत सकारात्मक संदेश गेला.

Post a Comment
0 Comments