प्रशासनापासून आरोग्यसेवेपर्यंत महिलांची समर्थ धुरा;
अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींचे मोलाचे योगदान....
कोरपनाच्या विकासरथाला महिला शक्तीचे बळ!
प्रशासनापासून आरोग्यसेवेपर्यंत महिलांची समर्थ धुरा अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींचे मोलाचे योगदान
संतोष मेश्राम
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मो न 9923497800
कोरपना(ता.प्र.): तालुक्याच्या प्रशासकीय, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि ग्रामविकास व्यवस्थेत महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. तहसील कार्यालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत, रुग्णालयांपासून अंगणवाड्यांपर्यंत आणि वनविभागापासून पोलीस यंत्रणेपर्यंत विविध जबाबदाऱ्या महिला समर्थपणे सांभाळत आहेत. कर्तव्यनिष्ठा, कार्यक्षमता आणि सेवाभावाच्या जोरावर कोरपना तालुक्याच्या विकासाला महिला शक्तीचा भक्कम आधार मिळाला आहे.
प्रशासनात महिलांचा प्रभावी सहभाग..
तहसीलदार पल्लवी आखरे, नायब तहसीलदार करिष्मा वासेकर, बालविकास अधिकारी मनीषा पाचभाई आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य कल्पना खोब्रागडे या महत्त्वाच्या प्रशासकीय व शैक्षणिक जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. पोलीस उपनिरीक्षक राधिका गायकवाड यांच्यासह ग्राम महसूल अधिकारी शीतल परतेकी, रोमा गादेकर, स्नेहल दाबेराव, पूजा टेकाम आणि जिजा मेश्राम महसूल व कायदा-सुव्यवस्थेच्या कामकाजात योगदान देत आहेत. सहाय्यक कृषी अधिकारी सुप्रिया कदम कृषी विभागाची जबाबदारी सांभाळत असून, नगराध्यक्ष नंदाताई बावणे कोरपना नगराच्या विकासकामांचे नेतृत्व करीत आहेत.
आरोग्यसेवेत महिला डॉक्टरांची महत्त्वाची भूमिका...
ग्रामीण भागातील नागरिकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात तालुक्यातील महिला डॉक्टरांचे योगदान उल्लेखनीय आहे. कोरपना ग्रामीण रुग्णालयात डॉ. तेजस्विनी टिपले आणि डॉ. बादल �

Post a Comment
0 Comments