Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल "माझी मी भारी" नारी सन्मानाने होणार सन्मानित.



मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

कुरखेडा:- रानभाज्यांची अभ्यासक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तसेच शेतकरी व गृहिणी असलेल्या मूळ गाव देऊळगाव /कुरखेडा जि.गडचिरोली  येतील संगीता संतोष ठलाल  गेली ३२ वर्षापासून साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत सोबतच गेली ८ वर्ष झालीत सामाजिक क्षेत्रात नि:स्वार्थ भावनेने  कार्य करत आहेत. एवढेच नाही तर त्यांनी मानवी जीवनाच्या  व मुक्या प्राण्यांच्या सुदृढ निरोगी आरोग्यासाठी   साहित्य क्षेत्रातील पहिला असलेला "रानभाज्यांच्या जगात" हा संशोधन ग्रंथ लिहून समाजासाठी भरीव मोठे योगदान दिले आहेत. सोबतच बोलीभाषा टिकून रहावी यासाठी "झाडीचा खाजा" झाडीबोली काव्यसंग्रह सुद्धा लिहिले आहेत. आजपर्यंत एकूण  ६४ वृतपत्रात  लिखाण केले आहेत. त्यांचे  साहित्यिक, सामाजिक क्षेत्रातील भरीव  योगदान बघून रेडीओ आकाशवाणी केंद्र नागपूर, दूरदर्शन सह्याद्री वाहिनी यांनी, त्यांची दखल घेऊन मुलाखत घेतली आहे.  भारत सरकारच्या साहित्य अकादमी दिल्लीच्या वतीने  आश्रमशाळा चांदाळा येथे  "ग्रामलोक" या कार्यक्रमात,जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवात त्यांचे कथन झाले आहे. शासकीय व इतर संस्थेद्वारा त्यांचे ११३ सत्कार झालेले आहेत सोबतच त्यांच्या संशोधन ग्रंथास पुरस्कार प्राप्त झाले आहेत. एक सामान्य शेतकरी, गृहीणी असताना सुद्धा दैनंदिन साहित्य सेवा त्या करत असतात, व ग्रामीण भागातील विद्यार्थांना वाचणाची आवड लागावी यासाठी नवसंजीवनी सार्वजनिक वाचनालय चालवतात. आणि लिहिण्याप्रमाणे सामाजिक उपक्रम सुध्दा राबवत असतात.  प्रचंड संघर्षातून घडलेल्या संगीता ठलाल  विशेष नारीशक्ती म्हणून व त्यांचे  समाजासाठी भरीव  असलेले  योगदान बघून   नाशिक येथील इनोव्हेटिव्ह  मेकर्स  अकॅडमी फाउंडेशन संस्थेच्या अध्यक्षा प्रा.आशा बिरारी पाटील यांनी संगीता ठलाल यांच्याकडून कोणतेही अपेक्षा न करता  निशुल्क  निवड करून  "माझी मी भारी" नारीसन्मान जाहीर केले आहे .  येत्या १८ तारखेला राणी भवन पंचवटी येथे मान्यवरांच्या हस्ते संगीता ठलाल यांना अतिशय मानाचा मानला जाणारा "माझी मी भारी" या नारी  पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या निवडीबद्दल विविध स्तरावरून संगीता ठलाल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments