Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

काप्पेवंचा गावातील दोन महिन्याचा बाळाचा लसीकरणानंतर दुर्दैवी मृत्यू.



 जबाबदार असलेले आरोग्य अधिकाऱ्यांचा सखोल चौकशी करून निलंबित करा.

आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे केली मागणी.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

अहेरी :-  राष्ट्रवादी युवक काँग्रेस गडचिरोलीचे जिल्हा सचिव - बालाजी गावडे यांनी मौजा - काप्पेवंचा गावातील आदिवासी समाजाचा आदिम माडीया  (PVTG) जमातीचा दोन महिन्याचा बाळाला लसीकरण दिल्यानंतर दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकरणी मध्ये जबाबदार असलेले सर्व आरोग्य अधिकारी/कर्मचारी यांना त्वरीत निलंबित करून चौकशी करणेबाबत निवेदन महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा आमदार डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदन देण्यात आले. 

          यावेळी निवेदनात म्हटले आहे की, मृत्यू झालेला बाळाचा आई  सुनीता शामराव तलांडी आणि वडील  शामराव दोघे तलांडी  दिनांक - १५/०९/२०२६ रोजी, शासन आणि प्रशासन यांना दिलेला विनंती अर्ज मध्ये नमुद केल्याप्रमाणे अहेरी तालुक्यातील मौजा - कप्पेवंचा गावातील अवघ्या दोन महिन्याचा आदिवासी समाजातील आदिम माडीया (PVTG) जमातीचा बाळाला दिनांक - ०७/०९/२०२६ रोजी,  मौजा - काप्पेवंचा येथे दुपारी ०२.०० वाजेचा दरम्यान  आरोग्य सेविका, MPW, आशा वर्कर, कंत्राटी आरोग्य सेवक हे चौघेजण आमचा घरी आले आणि तुमचा बाळाला लसीकरण देतो म्हणुन आमचा मुलाला ०४ इंजेक्शन दिले आणि ०२ वेगवेळ्या बटाल चे ०२ डच औषधी सुद्धा पाजले.  यामध्ये ०२ हाताला ०२ इंजेक्शन आणि ०२ पायाला ०२ इंजेक्शन असे एकुण ०४ इंजेक्शन दिले आहेत.

           सदर बाळाला इंजेक्शन आणि औषधी दिल्यानंतर - आरोग्य सेविका, MPW,  आशा वर्कर,  कंत्राटी आरोग्य सेवक हे म्हणाले की, फक्त एक दिवस ताप येऊ शकतो त्यानंतर काहीच होत नाही असे सांगुन ते कवटाराम गावाकडे निघुन गेले. 

  परंतु कवटाराम गावावरून पुन्हा आमचा काप्पेवंचा गावातूनच कोडसेपल्ली ला निघुन गेले परंतु  सदर बाळाचा विचारपुस सुद्धा केले नाहीत.

           तसेच बाळाला इंजेक्शन आणि औषधी दिल्यानंतर लगेच काही तासातच बाळ बेहोश झाल्यासारखे होत होता, दुध पिताच नव्हता, त्यानंतर सायंकाळ झाल्यामुळे आमचा मुलाला झोपण्यासाठी ठेवलो.  आणि रात्री १२.०० वाजेचा दरम्यान आमचा मुलाचा मृत्यू झाला आहे. 

           त्यानंतर पालक यांनी कुटुंबियांना माहिती दिलो, गावकऱ्यांना सुद्धा माहिती दिलो, आणि आमचा मुलाचा मृत्यू नंतर म्हणुन आशा वर्कर यांना माहिती देण्यात आली, आरोग्य सेविका यांना माहिती देण्यासाठी फोन करण्यात आले परंतु आरोग्य सेविका फोन उचलले नाही. 

         म्हणुन आरोग्य केंद्र पेरमिली आणि आरोग्य उपकेंद्र कोडसेपल्ली यांच्या निष्काळजी पणामुळे मुलाचा/बाळाचा मृत्यू झाला असे गंभीर आरोप मृत्यू झालेला बाळाचा आई आणि वडीलांनी केले. 

       त्यानंतर दिनांक - ०८/०९/२०२६ रोजी , पालकांनी मुलाला/बाळाला न्याय मिळण्यासाठी, सर्व दोषींवर कठोर कारवाई झाला पाहिजे म्हणुन आमचा राजाराम पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आला आहे.  तसेच मृत्यू झालेला बाळा PM करण्यासाठी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात नेतांना गाडीसोबत आरोग्य केंद्र पेरमिली आणि आरोग्य उपकेंद्र कोडसेपल्ली येथील एकादी कर्मचारी आमचा बाळासोबत रुग्णालय आले नाही आणि PM करतांना उपस्थित सुद्धा नव्हते. हे दुर्दैवी आहे.

       म्हणुन आता शासनाने सदर बाळाला लसीकरण देऊन जीव घेणारे सर्व जबाबदार असलेले आरोग्य अधिकारी यांचा त्वरीत निलंबन करून, त्यांची सखोल चौकशी करून, सर्व दोषींवर कठोर कारवाई करावे. 

      तसेच पेरमीली क्षेत्रामध्ये आदिवासी समाजाचा आदिम माडीया (PVTG) जमातीचा लोकसंख्या जास्त आहे म्हणुन पेरमिली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये नविन MBBS झालेला वैद्यकीय अधिकारी यांच्या नियुक्ती करावे. अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव - बालाजी गावडे यांनी आमदार डॉ, धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

Post a Comment

0 Comments