Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

गडचिरोली येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात बैठक.



  सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत सुरू असलेल्या तसेच मंजूर रस्ते व पुलांच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.


गडचिरोली :- जिल्ह्यातील प्रलंबित रस्त्यांची कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. खराब रस्त्यांची दुरुस्ती तातडीने हाती घेऊन कामांची गुणवत्ता आणि टिकाऊपणा याबाबत कोणतीही तडजोड करू नये, असे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


यापूर्वी मंजूर झालेल्या ५०० कोटी रुपयांच्या पाच प्रमुख कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. चंद्रपूर - आष्टी मार्गावरील १७ किलोमीटरच्या कामासह रस्त्यांचे पायाभूत व डांबरी थर तसेच पुलांची कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.


राष्ट्रीय महामार्गांच्या कामांसाठी आवश्यक वनविषयक व राष्ट्रीय वन्यजीव मंडळाशी संबंधित प्रलंबित मंजुऱ्यांचा संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून पाठपुरावा करण्यास सांगितले. लाहेरी - नारायणपूर या २८ किलोमीटरच्या रस्त्याच्या निविदा प्रक्रियेबाबतही आढावा घेतला.


अहेरी आणि एटापल्ली परिसरातील दुर्गम भागांना जोडणाऱ्या रस्ते व पुलांच्या कामांना विशेष प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या. पूरस्थितीत वाहतूक बंद होणारे मार्ग, पुलांचे पोहोचमार्ग तसेच कच्च्या रस्त्यांच्या सुधारणेसाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करण्यास सांगितले.


केंद्रीय रस्ते निधी आणि राज्य अर्थसंकल्पातील कामांची स्पष्ट वर्गवारी करून निधीची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले. निधीअभावी कोणतेही काम रखडू नये, यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्यासही सांगितले.


प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-४ अंतर्गत मंजूर कामांची पुढील प्रक्रिया, प्रलंबित प्रस्तावांची मंजुरी आणि मोठ्या पुलांच्या प्रकल्प अहवालांची पूर्तता विहित मुदतीत करण्याच्या सूचना दिल्या.


तसेच उमेद आणि माविमच्या कामांचाही आढावा घेतला. आदिशा प्रकल्पाची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.


गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात नागरिकांचा संपर्क आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रस्ते व पुलांची कामे दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून प्रलंबित बाबी तातडीने मार्गी लावाव्यात, असे निर्देश दिले.

Post a Comment

0 Comments