को.म.सा.प तळा शाखेतर्फे गुणवंत शिक्षकांचा पुरस्कार देवून सन्मान.
तळा -किशोर पितळे - (प्रतिनिधी)
कोकण मराठी साहित्य परिषद तळा शाखेच्या वतीने गुणवंत शिक्षक सन्मान आणि विविध स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
२ ऑक्टोबर(महात्मा गांधी जयंती) रोजी तळा येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमास तळा पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी दीपाली दिवेकर , केंद्रीय समन्वयक प्रा.एल.बी.पाटील रायगड जिल्हाध्यक्ष संजय गुंजाळ , माजी जिल्हाध्यक्ष सुधीर शेठ , युवाशक्ती अध्यक्ष सिध्देश लखमदे , तळा शाखाध्यक्ष संदीप जामकर , रोहाध्यक्ष सौ.संध्या दिवकर, गोरेगांव शाखाध्यक्ष तथा पत्रकार केदार खुळे , पत्रकार किशोर पितळे, परिक्षक गझलकार नागेश नायडू यांच्यासह तळा शाखेचे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. यावेळी प्राथमिक विभागातील माला भिंगारे ,माध्यमिक विभागातील सुहास वावेकर , उच्च माध्यमिक विभागातील भरत जोशी , महाविद्यालय विभागातील डॉ.सचिन बंगाळे या गुणवंत शिक्षकांना तसेच देशभक्ती पर काव्य लेखन स्पर्धेतील अंकुश जाधव ,माधवी मोतलिंग (पनवेल )जयंत देशपांडे (पोलादपूर ) , तर उत्तेजनार्थ म्हणून मनोहर म्हात्रे (अलिबाग ) आणि वैशाली साळुंखे ( रोहा ) यांना तसेच मनिषा पाटील , प्रगती तेलंगे,प्रियंका म्हात्रे यांना विविधमान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरविण्यात आले तसेच परिक्षक नागेश नायडू यांनाही सन्मानित करण्यात आले. यावेळी तळा गटशिक्षणाधिकारी दिपाली दिवेकर यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या कि २आँक्टोबंर महात्मा गांधी यांची जयंती निमित्त को.म.सा.प.ने गुणवंत शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित केले हा त्यांच्या कार्याचा गौरव करीत असताना त्यांच्या मधील असलेल्या सर्व गुणांची पारख करून दिला आहे. कोणत्याही प्रकारचा अहवाल न घेता देत असलेला पुरस्कार पंखात बळ देणारा आहे.महात्मा गांधी चे अभिवादन करीत इतिहासाची पाने चाळून जागृत केली.महात्मा गांधीजी नी स्वातंत्र्य पुर्व काळात गावाकडे चला विकास करा असा नारा पुकारून चरका,टकळी वर हातमाग व सुत कताई करून वस्त्रोद्योग तयार करून लोक खरेदी करीत असत आज ग्रामीण भागातील लोक शहरा कडे जात आहेत शालेय पट संख्या घटत आहेत शाळा बंद केल्या जात आहेत. ग्रामीण भागात आजी आजोबा रहात आहेत घटती पटसंख्या रोखायची असेल तर महात्मा गांधीचे विचार दुरदृष्टी चा अवलंब करून "गावाकडे चला विकास करा" या नाऱ्याप्रमाणे ग्रामीण भागात उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी चळवळ उभारण्याची गरज आहे घंदा उद्योग व्यवसाय झाला तर हाताला काम मिळेल उदरनिर्वाह होऊन ग्रामीण लोकसंख्या वाढेल. शहराकडील गेलेले परत येतील पटसंख्या वाढेल असे प्रतिपादन केले.
प्रा.एल.बी.पाटील,संजय गुंजाळ, दीपाली दिवेकर ,सुधीर शेठ ,महंमद परदेशी तसेच पुरस्कार प्राप्तशिक्षकांनी मनोगत व्यक्त केले संदीप जामकर यांनी प्रास्तविक तर सुत्रसंचालन प्रणय इंगळे यांनी केले.हेमंत बारटक्के यांनी आभार मानले .

Post a Comment
0 Comments