मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
अहेरी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांनी काल अहेरी येथील गट विकास अधिकारी यांची भेट घेतली.
या भेटीत अहेरी तालुक्यातील विविध विकास विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.यामध्ये प्रामुख्याने रस्ते दुरुस्ती,पिण्याच्या पाण्याचा प्रश्न,रोजगार हमी योजनेची कामे,शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा,शिक्षण व आरोग्य सेवेची परिस्थिती, तसेच ग्रामपंचायत स्तरावर प्रलंबित असलेल्या कामांचा समावेश होता.
तालुक्यातील अनेक गावांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असून,नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या तातडीने सोडवण्याची गरज असल्याचे डॉ.कंकडालवार यांनी यावेळी अधोरेखित केले.प्रलंबित कामांना गती द्यावी आणि शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा,यासाठी प्रशासनाने प्रभावी पाऊले उचलावीत,अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी गट विकास अधिकाऱ्यांनी संबंधित विषयांवर सकारात्मक चर्चा करून प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी अजय कंकडालवार यांचा सोबत गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अजय नैताम,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,कार्तिक तोगम माजी उपसरपंच,प्रकाश दुर्गे,प्रमोद गोडसेलवार,बापू गांधारला,आनंदराव तलांडी,किशोर तलांडी यांच्या सह आदी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments