Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

घोट येथे विद्युत वितरण कंपनीची तक्रार निवारण शिबिर.




नागरिकांनी आपले तक्रार अर्ज घेऊन उपस्थित राहावे. -डॉ.प्रणय भाऊ खुणे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटन.


मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.


 दिनांक 17 ऑक्टोंबर 2026

घोट :- चामोर्शी तालुक्यातील मौजा घोट  येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी व राष्ट्रीय मानवाधिकार संघटन (असो )दिल्ली जिल्हा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने विद्युत विभागाचे तक्रार निवारण शिबिराचे दिनांक 19 ऑक्टोबर रोज सोमवारला दुपारी 12:30 वाजता पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक समोरील मैदानात आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात प्रामुख्याने प्रमुख मार्गदर्शक मा. अनिरुद्ध पालकर (ओ, एस, डी) मुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य,)

डॉ. प्रणय भाऊ खुणे, प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटन व विद्युत विभागाच्या वतीने जिल्हा अधीक्षक अभियंता मा. खांडेकर साहेब, चामोर्शी तालुका कार्यकारी अभियंता मा.देवगडे साहेब व संबंधित उपअभियंता उपस्थित राहून घोट आष्टी मंडळातील गेल्या अनेक वर्षापासून विद्युत विभागाच्या ज्या प्रलंबित समस्या प्रामुख्याने स्मार्ट मीटर,वारंवार लाईट जाणे, लाईट बिल जास्त येणे व अनेक महत्त्वाच्या विद्युत विषयक समस्यावर माहिती मार्गदर्शन व *जागेवरच तक्रारीचे निरसन* करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी घोट आष्टी मंडळातील सर्व नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने या विद्युत विषयक तक्रार निवारण शिबिरास उपस्थित राहून आपल्या समस्या सोडवावे असे आवाहन राष्ट्रीय मानवाधिकार संघठन   जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष नानूभाऊ उपाध्ये, भाजपा तालुका अध्यक्ष राकेश सरकार, सरपंच सोमनाथ वैद्य, उपसरपंच मिहीर विश्वास,  किशोर कुंडू, महेश विश्वास,दिनेश मुजुमदार,पलास घरामी, जितेन शहा, विलास सावकार वडेट्टीवार, सुमेन विश्वास,राजू सातपुते, संदीप भोवरे, समीरण रॉय, गुरुदास पालकवार, सत्यवान तंटकवार, शुभंकर चक्रवर्ती, तपण माझी व विद्युत विभाग घोट मंडळचे वतीने करण्यात आले.

Post a Comment

0 Comments