Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

अँड,बोधी रामटेके यांनी दाखवलेली ठामता व न्यायालयाने घेतलेली दखल हेच परिवर्तनाचे खरे कारण.




न्यायालयीन लढ्यातून तब्बल 38 कोटींची निधी खेचून आणणाऱ्या अतिदुर्गम व आदिवासीबहुल वेंगनूर गावाची यशोगाथा.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

मुलचेरा :- 

वेंगनूरच्या लोकांनी न्यायालयात धाडस दाखवून गावासाठी 38 कोटींचा निधी मिळवला आहे.पावसाळ्यात चार ते पाच महिने पूर्णपणे संपर्क क्षेत्राच्या बाहेर असणाऱ्या वेंगनूर ग्रामपंचायतीकरीता हा मोठा विजय आहे. पाथ फाउंडेशनच्या माध्यमातून उच्च न्यायालयाला पत्र पोहोचवून आणि लोकांच्या सातत्यपूर्ण लढ्यामुळे प्रशासनाने 38 कोटी रुपये मंजूर केले. आता रस्ते, पूल, आरोग्य उपकेंद्र, मोबाईल टॉवर आणि पाणी-सुविधा यांसारखी मूलभूत सुविधा उपलब्ध होत आहेत. या भागात अजूनही बरेच विकास कामे सुरू आहेत. गावाकऱ्यांनी आणि तरुण वकिल तथा सामाजिक कार्यकर्ते बोधी रामटेके यांनी दाखवलेली ठामता व न्यायालयाने घेतलेली दखल हेच परिवर्तनाचे खरे कारण आहे.

Post a Comment

0 Comments