Type Here to Get Search Results !

भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्हा महानगर तर्फे आयोजित “पंडित दीनदयाल उपाध्याय जिल्हा प्रशिक्षण महाअभियान 2026”चे आयोजन




मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


चंद्रपूर :- भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्हा महानगर तर्फे आयोजित “पंडित दीनदयाल उपाध्याय जिल्हा प्रशिक्षण महाअभियान 2026” अंतर्गत जिल्हा महानगर प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. कार्यक्रमाला पक्षाचे पदाधिकारी, आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रशिक्षण वर्गाला चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रभारी मा. सौ. अर्चनाताई डेहनकर, श्री. शिवरायजी कुलकर्णी तसेच राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष मा. श्री. हंसराज भैय्या अहिर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी माननीय श्री. हंसराज भैय्या अहिर यांनी “कार्यकर्ता विकास, कार्यकर्त्यांचे सांभाळ व अपेक्षा” या विषयावर सखोल मार्गदर्शन करत संघटनामध्ये कार्यकर्त्यांचे महत्त्व, त्यांची जबाबदारी आणि पक्ष विस्तारामध्ये त्यांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. तसेच श्री. शिवरायजी कुलकर्णी यांनी “वैचारिक अधिष्ठान” या विषयावर मार्गदर्शन करत भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीचा मूलभूत पाया आणि राष्ट्रहितासाठी संघटनात्मक कार्याचे महत्त्व स्पष्ट केले.

प्रशिक्षण वर्गामध्ये पक्ष संघटन अधिक सक्षम, गतिमान आणि प्रभावी करण्याच्या दृष्टीने विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. आगामी राजकीय, सामाजिक आणि संघटनात्मक घडामोडींवर विचारमंथन करत कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचे कार्य या माध्यमातून करण्यात आले. पक्षाची विचारधारा अधिक व्यापक स्तरावर पोहोचविणे, संघटन अधिक बळकट करणे आणि कार्यकर्त्यांच्या कौशल्यवृद्धीस चालना देणे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे दोन दिवसीय “पंडित दीनदयाल उपाध्याय जिल्हा प्रशिक्षण महाअभियान 2026” निश्चितच कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी, मार्गदर्शक आणि ऊर्जा देणारे ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments