Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

राज्यसभा सदस्य, उत्कृष्ट संसदपट्टू मा. खा. मेधाताई कुलकर्णी यांचे आज राजुरा येथे आगमन




मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020916


चंद्रपूर :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की राज्यसभा सदस्य, उत्कृष्ट संसदपट्टू मा. खा. मेधाताई कुलकर्णी यांनी आज राजुरा येथे आयोजित भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्हा ग्रामीणच्या पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व संबोधित केले. विचारांची समृद्ध परंपरा, अभ्यासपूर्ण मांडणी आणि प्रभावी संसदीय अनुभवाचा ठेवा लाभलेल्या मा. मेधाताईंचे नागपूर येथे आत्मीयतेने स्वागत केले.


विचारांची समृद्ध परंपरा, संघटनात्मक बांधिलकी आणि प्रभावी संसदीय नेतृत्वाचा सुंदर संगम लाभलेल्या मा. मेधाताईंच्या उपस्थितीने या प्रशिक्षण महाअभियानाच्या समारोपाला विशेष उंची प्राप्त झाली. कार्यकर्त्यांच्या वैचारिक जडणघडणीसाठी आणि संघटन शक्ती अधिक सक्षम करण्याच्या ध्येयाने पार पडलेल्या या अभियानाने प्रेरणा, संस्कार आणि विचारांची नवी ऊर्जा निर्माण केली.यावेळी समस्त राजुराकरानी आपली उपस्थित दर्शवली होती

Post a Comment

0 Comments