Type Here to Get Search Results !

स्वच्छ, सुंदर आणि शाश्वत चंद्रपूरच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल…




मनोज एल खोब्रागडे

✍️मूख्य संपादक✍️

8208166961/9860020016


चंद्रपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की  दिनांक २२ /०५/२०२६ रोजी चंद्रपूर शहर महानगरपालिकेमध्ये मा. आयुक्त महोदय श्री.अकुनुरी नरेश यांच्या अध्यक्षतेखाली Solid Waste Management Rules २०२६ संदर्भात विशेष आढावा बैठक आयोजित करण्यात आली.


बैठकीमध्ये नवीन SWM Rules २०२६ अंतर्गत शहरामध्ये प्रभावी कचरा व्यवस्थापन, स्त्रोत स्तरावर कचरा वर्गीकरण (Source Segregation), Bulk Waste Generators ची जबाबदारी, प्लास्टिक व विशेष कचऱ्याचे व्यवस्थापन तसेच स्वच्छ सर्वेक्षण अनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.


नवीन नियमांनुसार आता प्रत्येक नागरिकाने घरगुती कचरा खालील 4 प्रकारांमध्ये वेगळा करणे आवश्यक आहे –

🟢 ओला कचरा

🔵 सुका कचरा

🔴 सॅनिटरी कचरा

⚫ विशेष / घातक कचरा


तसेच “No Segregation – No Collection” या संकल्पनेनुसार मिश्रित कचरा न देण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले. नवीन नियमांमध्ये Polluter Pays Principle, डिजिटल ट्रॅकिंग सिस्टीम, Bulk Waste Generators साठी ऑन-साईट वेस्ट प्रोसेसिंग आणि पुनर्वापर (Recycling) यावर विशेष भर देण्यात आला आहे.


मा. आयुक्त यांनी नागरिकांना आवाहन केले की,

“प्रत्येक नागरिकाने घरातूनच कचरा वर्गीकरण करून महानगरपालिकेस सहकार्य करावे. स्वच्छता ही केवळ महानगरपालिकेची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे.”

Post a Comment

0 Comments