मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक✍🏻
8208166961/9860020016
चंद्रपूर :- सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे आहे की आजच्या काळातील बेरोजगारी अधिकच वाढल्यामुळे व व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुण पिढीला घरून खर्चा साठी पैसे मिळत नसल्याने तरुण पिढी गुन्हेगारी कडे वळलेले जास्त प्रमाणात वाढले आहेत आणि ही तरुण पिढी आपल्या व्यसणासाठी काही पण करायला तयार असतात याचंच प्रत्येय म्हणून महांकाली कॉलरी,प्रकाश नगर, रमाई नगर चांदा फोर्ट रेल्वे स्टेशनं मध्ये चोरीचे प्रमाण,घर फोडीचे प्रमाण गांजाचे प्रकार अधिकच वाढलेले दिसत आहेत आणि त्यातच चांदा फोर्ट रेल्वे स्टेशनं जवळच असल्याने बाहेरून येणारे चोर सुद्धा इथे येऊन चोरी, घर फोडी करून वापस जात असतात.
एक पोलीस चौकी कँटिंग चौक महाकाली कॉलरी येथे आहे पण ती बंदच असते आणि दुसरी पोलीस चौकी चांदा फोर्ट रेल्वे स्टेशनं च्या बाजूला बागला चौक पोलीस चौकी असूनही चोरांना पोलिसांची भीती राहली नाही आणि या पोलीस चौकी मध्ये तक्रार करायला गेले तर ते सिटी पोलीस स्टेशनं पाठवतात मग तक्रार करण्यासाठी सिटी पोलीस स्टेशनं ला जावं लागते.पोलिसांची भीतीच राहिली नाही असच दिसून येत आहे. त्यामुळे तिथेच अशा गुन्ह्याची जास्त प्रमाणात वाढलेले आहे. त्यामुळे आज महाकाली कॉलरी येथील समाज सेविका व भाजपा च्या कार्यकर्त्यांनी थेट पोलीस अधीक्षक साहेब यांना भेटून आज निवेदन देवून चोरी, घरफोडी, व गांजा चे व्यसन करनाऱ्यांचा बंदोबस्त करावा ही विनंती करण्यात आली यावेळी भाजपचे कार्यकर्ते वाणी सादालावार,मनीषा ठूनेकर, बुंडू अय्यर्पल्लीवार,सचिन मोहुर्ले पपीता मोहुर्ले उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments