Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने झोन कार्यालयांमध्ये क्षमता वृद्धी कार्यशाळेचे यशस्वी आयोजन




मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


चंद्रपूर :- स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत राज्यस्तरीय निर्देशानुसार चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने विविध झोन कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी क्षमता वृद्धी (Capacity Building) कार्यशाळा आयोजित करण्यात आली.


या कार्यशाळेमध्ये कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावणे, आरोग्यविषयक जनजागृती करणे, केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देणे तसेच कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेदरम्यान कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्क, सुविधा व शासकीय योजनांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.


महानगरपालिकेच्या सर्व झोन कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यशाळेचा लाभ घेतला. अशा उपक्रमांमुळे कर्मचारी सक्षमीकरणास चालना मिळून स्वच्छ, सुंदर आणि सक्षम चंद्रपूर घडविण्याच्या संकल्पनेला बळकटी मिळत आहे.

Post a Comment

0 Comments