Type Here to Get Search Results !

वैष्णवी अपारमेन्ट येथील P.G. बिअर शॉपी हे दोन्ही दुकाने कायमचे बंद करण्याबाबत चर्चा करून निवेदन

 



मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


 चंद्रपूर :- चंद्रपूर पोलिस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी यांची भेट घेऊन चंद्रपूर येथील जगन्नाथ बाबा वॉर्ड मधील वैष्णवी अपार्टमेंटमध्ये असलेले पि. जे. बिअर शॉपी तसेच P.G. बिअर शॉपी हे दोन्ही दुकाने कायमचे बंद करण्याबाबत चर्चा करून निवेदन दिले. 


चंद्रपूर येथील जगन्नाथ बाबा वार्ड येथील वैष्णवी अपार्टमेंटमध्ये असलेले P.J. बिअर शॉपी तसेच P.G. बिअर शॉपी हे मागील ३ ते ४ वर्षांपासून सुरू आहे. सदरहू बिअर शॉपीमध्ये देशी तसेच विदेशी दारू भरपूर प्रमाणात विकत असतात. सदरहू शॉपीचे समोर सकाळी ५ वाजेपासून १२ वाजेपर्यंत देशी तसेच विदेशी दारू मिळत असल्यामुळे मद्दशौकिनांच्या रांगा लागलेल्या असतात. रविवार तसेच बंद असलेल्या दिवशी तर फारच गर्दी राहते. दोन्ही बिअर दुकानाचे समोर मद्दशौकीन रोडवर आपली वाहने ठेवतात. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होत असतात. यामुळे मागील हप्त्यात एका महिलेचा अपघात होऊन ती जखमी झाली. हे दोन्ही दुकान सोसायटीची परवानगी नसतांना सुध्दा जबरदस्तीने सुरू आहे. तसेच दोन्ही दुकानदारांनी बेकायदेशीरपणे दुकानाच्या समोर टिनाचे शेड टाकून अतिक्रमण केलेले आहे. त्यामुळे सदर दोन्ही बिअर शॉपी कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी नागरिकांनी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. 


पोलिस अधीक्षक यांनी यावर सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले. 


यावेळी नगरसेवक श्री. पप्पू देशमुख, सिनेट सदस्य प्रा. दिलीप चौधरी व मोठ्या संख्येने रहिवासी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments