Type Here to Get Search Results !

छत्रपती शाहू महाराजांची जयंती मिठाई वाटून साजरी..!




मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


पश्चिम मुंबई :- छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन युवा आघाडी, पश्चिमच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारकाजवळ मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.


आज राज्यात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती बदलण्यासाठी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे विचार मोलाचे आहेत. तोच विचार रुजवण्यासाठी व त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी आज वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.


वंचित बहुजन युवा आघाडीचे पश्चिम शहराध्यक्ष राहुल मकासरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.


यावेळी मनपा आयुक्त अमोल येंगडे, वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम जिल्हाध्यक्ष रूपचंद गाडेकर, पूर्व जिल्हाध्यक्ष बापू तायडे, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, मध्य शहराध्यक्ष मिलिंद बोर्डे, पश्चिम शहराध्यक्ष पंकज बनसोडे, नगरसेविका करुणा जाधव, वंदना पटारे, रेखा उजगरे, प्रविण हिवाळे, मेघानंद जाधव, तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments