Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

अनेक समस्यांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी हनुमान नगर झोन पदाधिकारी, नगरसेवक आणि मनपा अधिकारी यांची बैठक सपन्न




मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक✍🏻

8208166961/9860020016 


नागपूर :- नियमित स्वच्छता, अतिक्रमण निर्मूलन, मच्छरांसाठी धूर फवारणी, सिव्हर लाईन चोकेज, विहिरींची स्वच्छता, घराघरातून गोळा करणार येणारा कचरा, आदी समस्यांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी  हनुमान नगर झोन पदाधिकारी, नगरसेवक आणि मनपा अधिकारी यांची शुक्रवारी (ता.२६) बैठक पार पडली.

नागपूर महानगरपालिकेच्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हनुमान नगर झोन कार्यालयात झालेल्या प्रभाग क्रमांक २९,३१,३२,३४ च्या बैठकीत मनपाच्या उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, मनपा आयुक्त डॉ.विपीन, यांच्यासह झोन सभापती श्रीमती ज्योती देवघरे, अतिरिक्त आयुक्त श्री अंकित, अतिरिक्त आयुक्त श्री मिलिंद मेश्राम, नगरसेवक श्री. योगेश मडावी, श्री. अजय बोढारे,  श्री. गणेश चर्लेवार, श्री. चंद्रकांत खंगार,  श्रीमती मंगला मस्के, श्रीमती मानसी शिमले, श्रीमती सानवी  तरुडकर (शेंडे),  श्री.रितेश पांडे, श्रीमती रुपाली  ठाकुर, श्री. राम  कुंभलकर, श्री. नागेश मानकर,  श्री. संजय ठाकरे, श्रीमती मनीषा नगरधनकर, श्री. बाबाराव तायडे, मनपाचे उपायुक्त श्री निर्भय जैन, श्री. मंगेश खवले, झोनचे सहायक आयुक्त श्री नरेंद्र बावनकर, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. तुषार बारहाते, अधीक्षक अभियंता श्रीमती श्वेता बॅनर्जी,वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता श्री विजय गुरुबक्षानी , श्री श्रीकांत वाईकर यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments