व्येकटेश चालुरकर
तालुका प्रतिनिधी अहेरी
9209982212
अहेरी चालू सत्रात एप्रिल ते जून पर्यंतच्या कालावधीत तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्या नेतृत्वातील महसूल कर्मचाऱ्यांनी अवैध वाळू भरलेली तीन वाहने व मुरूम भरलेली दोन वाहने जप्त करून त्यांच्यावर 8.59 लाखाचा दंड आकारण्यात आला. यावेळी दोन ट्रक व तीन ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले यापैकी अवैध वाळू उत्खनन वाहतुकीच्या तीन कारवाईत 3. 55 लाखाच्या दंडापैकी 2.37 लाख दंड वसूल करण्यात आला. तसेच अवैध मुरूम उत्खनन वाहतुकीच्या दोन प्रकरणात पाच लाख तीन हजाराचा दंड आकारण्यात आला असून तेवढीच रक्कम वसूलही करण्यात आली.
मात्र सदर अवैध गौण खनिज उत्तखनन वाहतुकी संदर्भात एफ आय आर दाखल झाल्याने न्यायालयाच्या आदेशान्वयेच वाहनांची सुटका होणार असल्याची माहिती महसूल विभागाद्वारे आहे.

Post a Comment
0 Comments