तळा-किशोर पितळे-
महाराष्ट्र राज्य शासनाच्या आदेशानुसार ग्रुप ग्रामपंचायत महागाव येथे राज्याचे माजी दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित (दादा) पवार यांची जयंती प्रथमच साजरी करण्यात आली प्रारंभी दादांच्या प्रतिमेला पुष्पहार व उपस्थित ग्रामस्थांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले व भावपूर्ण आदरांजली वाहिली.यावेळी ग्रामपंचायत अधिकारी स्नेहल बैकर(तांबडे) यांनी कार्यक्रम प्रस्तावना करून कै.अजित (दादा)पवार याचा महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते अजित अनंतराव पवार जन्म२२जुलै १९५९ अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला–त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (सध्याच्या उपमुख्यमंत्री) आहेत. त्यांना पार्थ आणि जय हे दोन मुलगे आहेत.२८जानेवारी २०२६ पर्यंत राज्याच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. ते त्यांच्या कठोर निर्णयक्षमता,शिस्तबद्ध, वेळेला महत्त्व देत असत त्यांची कार्यशैली आणि विकासात्मक दृष्टिकोनासाठी ओळखले जात असत. राजकीय कारकीर्दीत दीर्घकाळ उपमुख्यमंत्री तब्बल सहा वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिले होते.अर्थ खात्याची धुरा सांभाळली होती वयाच्या ६७व्या वर्षी आपल्या गावाला जात असताना हेलिकॉप्टर च्या अपघातात निधन झाले यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा विषयी उजाळा देण्यात आला.या वेळी ग्रामस्थांनी दादा च्या आठवणी जाग्या केल्या.यावेळी माजी उपसरपंच तथा वरदायीनी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संतोष आमले,पोलीस पाटील कांतीलाल कसबळे, सदस्य ग्रामस्थ तथा माजी तंटामुक्ती अध्यक्ष साळवी मामा,ग्रामपंचायतकर्मचारी,अंगणवाडी सेविका,महागाव महिला मंडळ वर्ग आदी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments