Type Here to Get Search Results !

तळा तालुक्यातील लोकशाहीरी परंपरेचा रामचंद्र घाणेकर बुवा महान तारा निखळला.



तळा तालुका प्रतिनिधी 

किशोर पितळे


तळा :- तळा तालुक्यातील शक्ती-तुरा शाहिरी परंपरेचे खंदे शिलेदार आणि आपल्या सर्वांचे लाडके *'बादशहा*' श्री.शाहीर रामचंद्र हरी घाणेकर बुवा यांचे आज दिनांक २१/०७/२०२६ रोजी   राहत्या घरी पढवण येथे दुःखद निधन झाले म्रुत्यु समयी ६५ वर्षाचे होते.पश्चात ३मुलगे सूना नातवंडेअसा परिवार आहे १० वर्षापूर्वी पत्नी निधनाने खचले होते तरी देखील दु:खावर मात करीत लोकशाहिरी जपली होती.गेले दोन वर्षे उच्च रक्तदाब,डायबेटिस (अर्धांगवायू )पँरालिसिसआजाराने त्रस्त होते.पढवणच्या मातीतजन्मलेला हिरा आपल्यालोकशाहिरीतूनरसिकांना मंत्रमुग्ध करून आपली कला सादर करीत असत घरातील प्रतिकूल परिस्थितीत जास्त शिक्षण घेता आले नाही मैदानी खेळाची आवड होती त्याबरोबर बालवयात गणपती सणात नाचगाणी बघायची आवड लागली त्यामधूनच संगीत भजन,नाच,भारुड, गवळणी रचूलागलेआणीअल्पावधीतच शाहिर नाव लौकिक मिळवला होता. रायगड सह कोकणातशाहीरीगाजवली आज पर्यंत अनेक कलांवता जवळ भजनाची,नाचाची डबल बारी केल्या कधीच हार मानली नाही शाहिरीतून समाज प्रबोधन,जनजागृती करीत असत.त्यांना "रायगड भुषण" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.उतार काळात शेवटचे गायलेले रचलेले गाणं डोळ्यात अश्रू आणणारे आहे.तालुक्यात नावाजलेलेव्यक्तीमत्व होते. कै.रामचंद्र बुवा घाणेकर यांच्या निधनाने लोकशाहीर कलावंताला तालुका मुकला आहे शक्ती-तुरा क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे यापुढे असा कलावंत होणे नाही अशा रसीकांमधून शोक व्यक्त केलाजातआहे.त्यांच्याअंत्यविधी प्रसंगी विविध क्षेत्रातीलमान्यवरव्यक्ती, रसीक चाहते नातेवाईक, मित्र मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments