Type Here to Get Search Results !

तळा रहाटाड रस्त्यावर चिखल खडेमातीचे साम्राज्य. रस्त्यावर माती वाहून आल्याने अपघाताला आमंत्रण. जमीन मालकावर नागरिकांची कारवाईची मागणी.



तळा -किशोर पितळे-


तळा रहाटाड मुख्य मार्गालगत जमीनी मालकांनी खरेदी करून साईटपट्टीची दैयनीय अवस्था झाल्याचे पहायला मिळत आहे.सदर रस्ता वेडीवाकडीवळणे,तीव्रउताराचाआहेजमीनमालकाच्या 

हलगर्जीपणामुळेच जमीन साफसफाई झाडे झुडपे तोडल्याने व जेसीबीच्या सहाय्याने संपूर्ण माती काढल्याने सदर माती पावसाच्या पाण्याने रस्त्यावर आली असून चारचाकी वाहने दुचाकी,मिनिडोअर रिक्षा, अँटोरिक्षा,मोटार सायकल घसण्याच्या घटना घडल्या आहेत साईटपट्टी फुटभर खोली झाली आहे संपूर्ण रस्त्यावर खडे,मोठी दगडे, खड्डे पडले असून चिखल मातीचे साम्राज्य आहे वाहने चालवताना जीव मुठीत धरून चालवावे लागत आहे.एस टी बसचालका च्या तत्परतेने मुळे होणारा अनर्थ टळला मात्र सुदैवाने मोठी जीवीत हानी झाली नसली तरी भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. रस्त्यावर आलेल्या मातीच्या भरावाला जागा मालकाच्या हलगर्जीपणा मुळेच त्रास भोगावा लागत आहे त्याची योग्य व्यवस्था न केल्याने  मोठा अपघात घडण्याची शक्यता असून सदर चांगल्या रस्त्याची यांच्या मुळे दुरावस्था झाल्याचे नागरिकांचे म्हणणे असून जमीन मालकीची मुजोरी वाढलीआहे संबंधीत विभागाचे अधिकारी यांनी मालकांवर कडक कारवाई ची मागणीकेलीजातआहे.

Post a Comment

0 Comments