मनोज एल खोब्रागडे
✍️मुख्य संपादक✍️
8208166961/9860020016
नागपूर : - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे आज मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत बोधगया दर्शन रेल्वे यात्रेचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ झाला. तसेच, बोधगया दर्शन रेल्वे यात्रेच्या ८०० यात्रेकरुंना प्रातिनिधिक स्वरुपात मोफत प्रवास तिकीटाचे वाटप करण्यात आले.
भगवान गौतम बुद्धाच्या विचाराचे प्रेरणास्त्रोत म्हणून आपण बोधगया येथे जातो. एकदा तरी तेथे जाऊन दर्शन घेण्याची ओढ भाविकांमध्ये असते. ज्येष्ठ नागरिकांच्या दर्शनाची इच्छा पूर्ण व्हावी, या दृष्टीने आपण मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु केली. नागपूर येथून या योजनेअंतर्गत यावर्षी सुमारे ८०० भाविकांना जाता येत आहे, याचा मनस्वी आनंद असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
यावेळी मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार कृष्णा खोपडे, आमदार समीर मेघे, आमदार चरणसिंग ठाकूर, नागपूरच्या महापौर निता ठाकरे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments