Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

ग्रामसभेच्या ठरावालाही हरताळ! अवैध दारू विक्रेत्यांना महिलांनी रंगेहात पकडलं



आलेवाहीच्या महिलांचा धाडसी पराक्रम! अवैध दारूविक्री करणाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं

दारूबंदी असूनही सुरू होती अवैध विक्री; महिलांच्या धाडसी कारवाईने उघड झाला प्रकार

नागभीड :-नागभीड तालुक्यातील तळोधी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आलेवाही गावात ग्रामसभेने दारूबंदीचा ठराव मंजूर केला असतानाही कथित अवैध दारूविक्री सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी गावातील महिलांनी धाडस दाखवत दोन जणांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.


चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील आलेवाही गावात ग्रामसभेच्या सर्वानुमते दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र, ग्रामीणांच्या आरोपानुसार प्रेमदास तोरे आणि त्याचा साथीदार अजय भानारकर हे कथितरित्या गावात अवैध दारूविक्री करत होते.


ग्रामीणांच्या म्हणण्यानुसार, विरोध करणाऱ्यांशी अरेरावीची भाषा वापरून दारू विक्री सुरूच ठेवण्यात येत होती. यानंतर गावातील महिलांनी पुढाकार घेत दोघांना पकडले. त्यांच्या ताब्यातून 20 दारूच्या बाटल्या जप्त झाल्याचा दावा करण्यात आला.


घटनेची माहिती मिळताच तळोधी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार राहुल गुहे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय  चंद्रकांत लांबट व तळोधी पोलीस करीत आहेत.


जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी 

जनसंवाद न्यूज चंद्रपूर नागभीड

Post a Comment

0 Comments