✍️ भवन लिल्हारे भंडारा, गोंदिया जिल्हा प्रतिनिधी📱 मो. नं.9373472847 / 8888519894
भंडारा : (दिनांक ९ जुलै २०२६ ) भंडारा व गोंदिया जिल्हा महायुतीच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा सदस्य आणि भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार म्हणून विजय मिळवून नवनिर्वाचित राज्यसभा खासदार श्री राजेंद्र जैन आणि नवनिर्वाचित विधान परिषद आमदार श्री अविनाश ब्राह्मणकर यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
*स्थळ** सत्कार सोहळा शनिवार, दि. ११ जुलै २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता, लक्ष्मी सभागृह (जे. एम. पटेल जवळ), भंडारा येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक राज्याचे महसूल मंत्री नामदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे, अध्यक्षस्थानी खासदार श्री प्रफुल पटेलजी व प्रमुख अतिथी म्हणून भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकजजी भोयर, गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री श्री इंद्रनिलजी नाईक तसेच आमदार श्री परिणयजी फुके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. विशेष अतिथी म्हणून आमदार श्री राजकुमार बडोले, आमदार श्री विजय रहांगडाले, आमदार श्री विनोद अग्रवाल, आमदार श्री नरेंद्र भोंडेकर, आमदार श्री राजूभाऊ कारेमोरे, आमदार श्री संजय पुराम, जिल्हा परिषद अध्यक्ष श्री लायकराम भेंडारकर, भाजपा संघटक श्री विरेंद्र (बाळा) अंजनकर, बीडीसीसी बँकेचे अध्यक्ष श्री सुनील फुंडे तसेच प्रदेश महासचिव श्री धनंजय दलाल उपस्थित राहणार आहेत.
तरी या भव्य सत्कार सोहळ्यास महायुतीचे सर्व वरीष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष श्री आसू गोंडाने, सौ. सीताताई रहांगडाले, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्री नानाभाऊ पंचबुद्धे, श्री प्रेमकुमार रहांगडाले, शिवसेना जिल्हाध्यक्ष श्री अनिल गायधने आणि श्री मुकेश शिवहरे व महायुतीच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आव्हान केले आहे.

Post a Comment
0 Comments