मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक✍🏻
8208166961/9860020016
चंद्रपूर :- कु.अक्षरा व अंकुश राजेश्वर बोधलवार यांच्या संपूर्ण वार्षिक शिक्षणाचा खर्च शिवसेना चंद्रपूर जिल्हाप्रमुख श्री. संदीपभाऊ गिऱ्हे व चंद्रपूर मनपा स्थायी समिती सभापती सौ.मनस्वीताई गिऱ्हे यांच्याकडून जाहीर; सामाजिक बांधिलकीचे कौतुकास्पद पाऊल!
मूल तालुक्यातील हळदी गावच्या रहिवासी कु. अक्षरा व अंकुश राजेश्वर बोधलवार यांच्या पाठीशी गिऱ्हे परिवार खंबीरपणे उभा राहिला आहे. मागील तीन वर्षांपासून कु.अक्षरा व अंकुश यांचा संपूर्ण वार्षिक खर्च चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. संदीपभाऊ गिऱ्हे आणि चंद्रपूर मनपा स्थायी समिती सभापती सौ. मनस्वीताई संदीप गिऱ्हे यांच्या मार्फत केला जात आहे.कु.अक्षरा यांच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणात कोणतीही अडचण येऊ नये, या उद्देशाने गिऱ्हे परिवाराने हा संपूर्ण खर्च उचलला आहे. आज दिनांक १ जुलै २०२६ रोजी हळदी या गावी जाऊन त्यांना शिक्षणाचे संपूर्ण साहित्य, कपडे , शू , दप्तर तसेच बुक साहित्य दिले . गिऱ्हे दाम्पत्याने जपलेल्या या सामाजिक बांधिलकीचे आणि दातृत्वाचे हळदी गावासह संपूर्ण मूल तालुक्यात भरभरून कौतुक होत आहे. संकट काळात मिळालेल्या या खंबीर आधारामुळे बोधलवार परिवाराने श्री. संदीपभाऊ गिऱ्हे व सौ. मनस्वीताई गिऱ्हे यांचे मनापासून आभार मानले आहेत.

Post a Comment
0 Comments