Type Here to Get Search Results !

पंचायत समिती व तालुका कृषी अधिकारी यांचे संयुक्त विद्यमाने कृषी दिन साजरा.



किशोर पितळे 

तळा तालुका प्रतिनिधी 

तळा:-महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या जन्म दिनी १जुलै कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.महाराष्ट्र कृषी प्रधान होण्यासाठी विषेश प्रयत्न केल्याने त्यांना हरितक्रांतीचे जनक म्हणून संबोधले जाते.याकार्यक्रमाचे आयोजन पंचायत समीच्या नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात करण्यात आले होते या प्रसंगी पंचायत समिती चे सभापती, नथुराम हिलम, उप सभापती रवी शेठ मांडवकर,जिल्हा परिषद सदस्यां नलीनी लोखंडे, माजी समापती तथा विद्यमान सदस्या अक्षरा कदम, सदस्या रुपाली तांडेल, गटविकास अधिकारी सुनील गायकवाड,तालुका कृषी अधिकारी कांबळे, राष्ट्रवादी ता.अध्यक्ष नानाभौड,महिला अध्यक्षा जान्हवी शिंदे, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत राऊत , सचिव कैलासजी पायगुडे व्यासपीठावर उपस्थित होते. कै.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.कै.वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना हरित क्रांती घटवून आणण्यासाठी खुप मोठे योगदान दिले आहे. त्या काळात शेती हि एक नंबर वर होती. शेतकरी देशाचा आर्थिक कणा आहे.त्यांना सोयी सुविधा उपलब्ध शेती पुरक उद्योगांना प्रोत्साहीत केले. त्यांच्या जयंती निमित्ताने राज्यात जिल्हा,राज्य पातळी वर शेतकरी पुरस्कार देऊन शेतकऱ्यांचा सन्मान केला जातो. यावेळी उपसभापती रवीशेठ मांडवकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की कै.वसंत राव नाईक यांचे योगदान मोठे आहेशेतकऱ्यासाठी कल्याणकारी योजना राबविल्या त्या काळात शेती हि एक नंबर वर होती.राज्य सुजलाम सुफलाम होण्या साठी जमीनी ओलीता खाली आणण्यासाठी कालवा निर्मिती केली शेतकरी देशाचा आर्थिक कणा आहे.

शासनाच्या विविध योजना सुविधा असल्या तरी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारच्या शेती केली पाहिजे तालुका डोंगराळ भागात असला तरी भात शेती हे एकमेव उत्पादन करतो या काळात शेती क्षेत्र कमी झाले असले तरी तालुक्यातील ग्रामीण भागातून जवळपास करवंदाची लाखो रू.उलाढाल होत आहे.जर आपणच गोळा करून उत्पन्नघेऊशकतो याचे उदाहरण देऊन भात शेती व्यतिरिक्त शेती पुरक इतर उद्योग शोधावेत.असे आवाहन केले. चंद्रकांत राऊत यांनी सांगितले की देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे.आज परिस्थिती बदल गेलीआहे शेती कनिष्ठ झाली आहे.भात शेतीचे उत्पादन खर्च अधिक आणी आर्थिक उत्पन्न कमी असल्याने परवडत नाही.वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरदार लोकांना आर्थिक स्थिती मजबूत होत गेली आहे मात्र जगाचा पोशिंदा वर्षभर मेहनत करून भाताला योग्य दर मिळत नाही मिळाला असता तर युवापिढी शेती कडे वळून प्रयोग करून राहिला असता अशी खंत व्यक्त केली. यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली.या कार्यक्रमाला तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments