Type Here to Get Search Results !

गडचिरोली पोलिसांची अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई




मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


गडचिरोली :- स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली व उपपोस्टे रेपनपल्ली पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेतले.


एकूण ₹5,98,300/- किमतीचा अवैध दारू साठा व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले चारचाकी वाहन जप्त करण्यात आले. गोपनीय माहितीच्या आधारे मौजा रेपनपल्ली येथे सापळा रचून ही यशस्वी कारवाई करण्यात आली.


आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अवैध दारू विक्री व वाहतुकीविरुद्ध गडचिरोली पोलिसांची कठोर कारवाई सुरूच आहे.

Post a Comment

0 Comments