त्रिशा राऊत नागपूर जिल्हा क्राईम रिपोर्टर मो 9096817953
नागपूर:नागपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपुरातील पिटेसूर-गोरेवाडा रोडवर शनिवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडेखोरांनी एका ऑटोचालकाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात इतर दोघे जण देखील जखमी झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण नागपूर शहरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
काय घडलं नेमकं?
मोहम्मद काशिफ मोहम्मद रफीक (रा. मोमिनपुरा) असे मृत्यू झालेल्या ऑटोचालकाचे नाव आहे. मोहम्मद काशिफ हे शनिवारी रात्री कॅटरिंगचे काम करणाऱ्या नऊ प्रवाशांना सोडण्यासाठी गेले होते. काम संपवून ते गोरेवाडा रिंग रोडवरून मोमिनपुराकडे परतत असताना, पिटेसूर-गोरेवाडा रोडवर दबा धरून बसलेल्या सशस्त्र दरोडेखोरांनी त्यांचा ऑटो अडवला. दरोडेखोरांनी ऑटोचालक आणि प्रवाशांना शस्त्रांचा धाक दाखवून त्यांच्याकडील दागिने, रोख रक्कम, मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तू लुटण्याचा प्रयत्न केला.

Post a Comment
0 Comments