Type Here to Get Search Results !

वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते भुसावळ सह-दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नव्या इमारतीचे लोकार्पण




मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961,/9860020016


जळगाव : -भुसावळ येथील तहसील कार्यालय परिसरात उभारण्यात आलेल्या सह-दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नविन प्रशस्त इमारतीचे लोकार्पण राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. नव्या इमारतीमुळे नागरिकांना अधिक आधुनिक, सुसज्ज व कार्यक्षम सेवा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


यावेळी उपविभागीय अधिकारी  जितेंद्र पाटील, तहसीलदार नीता लबडे, प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, मंदार पाठक, सहदुय्यम निबंधक नितीन सोनवणे यांच्यासह भुसावळ नगर पालिकेचे नगरसेवक,आदी उपस्थित होते.


यावेळी मंत्री श्री सावकारे यांनी नव्या इमारतीची पाहणी करून कार्यालयीन सुविधांचा आढावा घेतला. नागरिकांना दस्त नोंदणीसाठी अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक सेवा मिळणे आवश्यक असून, त्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधा महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी नमूद केले.


नवीन प्रशस्त इमारतीमुळे दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांची सोय होणार असून कार्यालयीन कामकाज अधिक गतिमान  आणि परिणामकारक होण्यास मदत होईल,असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.


उद्घाटनानंतर उपस्थितांनी नव्या इमारतीची पाहणी केली व उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांचे स्वागत केले. या नवीन इमारतीमुळे  नागरिकांना अधिक दर्जेदार व सोयीस्कर शासकीय सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 या कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments